डॉक्टरांच्या समस्या मांडणाऱ्या राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षांचे शरद पवारांकडून कौतुक !

” आयुष ” डॉक्टरांच्या समान हक्कांसाठी डॉ. कावरे यांचे खा.शरद पवारांना साकडे !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगर मतदार संघात गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपयाची आरोग्यसेवा अनेक मोठमोठ्या शस्त्रक्रिया गोरगरीब जनतेला मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून देत आपल्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविणारे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर बाळासाहेब कावरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आयुष डॉक्टरांच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रातील भाजप सरकारने घोषित केलेल्या धोरणानुसार ॲलोपॅथीक व आयुष डॉक्टरांचा दर्जा समान असणार आहे . परंतु ही फक्त समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धी प्राप्त करुन वैद्यकीय क्षेत्राची दिशाभूल करणारी घोषणा आहे.हे वास्तव समोर आणत वास्तविक पाहता सरकारी ते खाजगी सर्वच क्षेत्रामध्ये आयुष डॉक्टरांना दुय्यम वागणूक दिली जात आहे . म्हणून राज्यातील सुमारे पाच लाखहून अधिक आयुष डॉक्टरांच्या समान हक्कांसाठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ बाळासाहेब कावरे यांनी आ निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकार्यांसमवेत बारामती येथील गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
केंद्राच्या या भंपक घोषणेमुळे ॲलोपॅथीक डॉक्टरांमध्येही संभ्रम असून आयएमए व आयुष मधले मैत्रीपुर्ण संबंध कमी होवून वाद विकोपाला जावू नयेत यासाठीही प्रयत्न राष्ट्रवादी डॉक्टर सेल यापुढे काम करेल असेही डॉ .कावरे यांनी पवार साहेबांना आश्वासित केले.राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी तुमच्या सारखे संबंधित डॉक्टरांच्या प्रश्नावर विधायक विषय अधोरेखित करावा असे सांगत डॉक्टर कावरे यांच्या सामाजिक कार्याचे खासदार शरद पवार यांनी कौतुक केले .
या वेळी डॉ.कावरे यांच्या समवेत डॉ भूषण पवार ,डॉ .श्याम पाटिल , ॲड. गणेश कावरे , सुभाष कावरे, प्रवीण औटी हे उपस्थित होते.