भायगावच्या उपसरपंचपदी आशा लांडे यांची बिनविरोध निवड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह सहा जागेवर दणदणीत विजय मिळवून निर्विवाद बहुमत सिद्ध केले होते.लोकनियुक्त सरपंचही सौ. मनीषा आढाव यांची मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या तर जगदंबा ग्रामविकास पॅनलला तीनच जागेवर समाधान मानावे लागले. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे प्रवेशद्वार असणाऱ्या भायगाव ग्रामपंचायत ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून याकडे पाहिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच दोन गट आमने-सामने आले तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी बंड करून काही जागासह सरपंचपदीही उमेदवार उभा केले होते. या सर्वांनाच पांडुरंग विकास पॅनलने पराभुत करून सहा जागासह सरपंचपदी मोठ्यामताधिक्याने विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. पांडुरंग ग्रामविकास पॅनलचे राष्ट्रवादीचे सरपंच राजेंद्र आढाव यांच्या नेतृत्वाखाली यापॅनलने विजय मिळवला. उपसरपंच पदासाठी सौ. आशा एकनाथ लांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भगवानराव आढाव, जनार्धन लांडे, हरिचंद्र आढाव, डॉ.विजय खेडकर, रामनाथ आढाव, सदाशिव शेकडे, सखाराम शेकडे, रावसाहेब आढाव, सोपान लांडे, परसराम चोपडे, कल्याण आढाव,डॉ. रामराव आढाव,बबन सौदागर, हरिभाऊ काळे,अनिल लांडे,नारायण आढाव, पांडुरंग आढाव, गणपत आढाव, कैलास लांडे, आजिनाथ लांडे, राजू सुरोशे,अर्जुन भापकर, रंगनाथ आढाव,बाळासाहेब लांडे, सोन्याबापू सौदागर, गंगाराम नेव्हल, रमेश आढाव, संदीप लांडे, नानासाहेब लांडे, बाळासाहेब सौदागर, कचरू खंडागळे, किशोर लव्हाळे, सतीष आढाव, आप्पासाहेब सौदागर यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. यु.तळवाल यांनी काम पाहिले. तर ग्रामविकास अधिकारी एस. जे. शेख यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी कटिबद्ध
भायगाव हे शेवगाव -नेवासा राजमार्गावरील गाव आहे. गावामध्ये अनेक विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे गावात विकास कामाची शृंखला तयार करू यापुढील काळात आपण जास्तीत जास्त निधी आणून गावच्या विकाससाठी कटिबद्ध राहू.
राजेंद्र आढाव
राष्ट्रवादी गटनेते भायगाव