राजूरची अवैध दारू थांबेना आंदोलनाचा दिला इशारा

:राजूर प्रतिनिधी
राजूर व आजूबाजूच्या खेड्यातील अवैध दारू थांबत नसल्याने दारूबंदी आंदोलकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
आंदोलकांनी निवेदन देऊन इशारा दिला आहे की
राजूर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकारी आल्यावर .अवैध दारू थाम्बवायला आता गती येईलअसे वाटत होते . पण अवैध दारू पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न निराशाजनक आहे. पुन्हा एकदा राजूर व आजूबाजूच्या खेड्यात अवैध दारूविक्री सुरू झाली.
दिनांक २४ डिसेंबरला उत्पादन शुल्क च्या बाहेरच्या पथकाला दारू सापडली. त्यांनी कारवाया केल्या पण ती दारू पोलिसांना कशी सापडत नाही हा प्रश्न सर्वाना पडतो आहे.राजूर पोलीस स्टेशन चा धाक वाटत नाही.. यामुळे लवकरच राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार आहे
१) राजूरमधील नेहमी दारू विकणारे विक्रेते पोलिसांना माहीत आहेत.त्यांच्यावर आजपर्यंत दाखल झालेले सर्व गुन्हे कटर करून तडीपार प्रस्ताव दाखल करावा
२) राजूरमधील पोलीस व दारूविक्रेते यांचे संबंध अर्थपूर्ण असल्याने सर्व जुन्या पोलिसांच्या बदल्या कराव्यात
३) राजूरमध्ये तातडीने ग्रामरक्षक दल स्थापन करावे या
मागण्यांसाठी आम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार आहोत असे अकोले तालुका दारूबंदी आंदोलन चे कार्यकर्ते संतोष मुर्तडक काशिनाथ भाडांगे यांनी म्हटले आहे