रामकृष्ण गोरे यांचा अमृत महोत्सव सोहळा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील रहिवासी असणारे व शेवगाव पंचायत समितीचे सेवानिवृत अधिकारी रामकृष्ण (नाना) गोरे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त रामायणाचार्य ह. भ. प. वैभव महाराज माळवदे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम व त्यानंतर ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार साहित्यिक लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी आमदार पांडुरंग अभंग, सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक डी.डी. गवारे साहेब, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरटाकळी येथील साई सिद्धी मंगल कार्यालय अँड लॉन्स मध्ये दि.१/१/२०२३ रोजी ११ वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.किरण गोरे व सचिन गोरे यांच्यासह परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.