अकोले मध्ये रोटरी नेत्र तपासणी केंद्राचे उदघाटन संपन्न

अकोले (प्रतिनिधी)- समाजात अनेक माणसे राहतात,मात्र सेवा करण्याची संधी काहींनाच मिळते. ते भाग्य रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना मिळाले आहे.आपण समाजासाठी काम करताना पैशाची उणीव भासत नाही मात्र स्वतःचा बहुमोल वेळ समाजासाठी देणे हे कार्य कौतूकास्पद आहे.असे प्रतिपादन संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन संतोष करवा यांनी केले.
जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त अकोलेकरांच्या सेवेसाठी अकोले शहरात सारडा पेट्रोल पंपाच्या मागे कायमस्वरूपी रोटरी नेत्र तपासणी केंद्राचे उदघाटन संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन संतोष करवा यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ति देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व रोटरी व रोटरी क्लबचे मार्गदर्शक ह.भ.प.रो.दीपक महाराज देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर संगमनेर मर्चंट बँक,संगमनेरचे व्हा.चेअरमन प्रकाश कलंत्री,अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे,अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,रोटरी आय केअर ट्रस्ट, संगमनेर चे अध्यक्ष संजय राठी, सेक्रेटरी संजय लाहोटी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर दीपक मणियार,रोटरी क्लब संगमनेर चे अध्यक्ष रो.आनंद हासे, रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष रो.अमोल वैद्य, अध्यक्ष रो.सुनील नवले, संदेश चष्माघरचे संचालक रो.अमोल देशमुख हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संतोष करवा म्हणाले की -नेत्र तपासणी केंद्र अकोलेत रोटरी क्लबने सुरू करून आदिवासी,दुर्गम,डोंगराळ भागातील गोरगरिबांना सेवा दिली आहे,नक्कीच त्यांचे आशीर्वाद सर्व सदस्यांच्या मागे राहतील अशी आशा व्यक्त करत सर्वांनीच या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. व मर्चंट बँक ग्राहकांसाठी देत असलेल्या सुविधांची करवा यांनी माहिती दिली.
र अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प.दीपक महाराज देशमुख म्हणाले की, रोटरी आय केअर हॉस्पिटल ने गेली 34 वर्षे अविरतपणे डोळे तपासणी व ऑपरेशन केली आहे.काहीजण पैसा कमविण्यासाठी व्यवसाय सुरू करतात. मात्र रोटरी आय केअर सेवाभावी वृत्तीने हे काम चालू ठेवले आहे.त्याचाच एक भाग म्हणून अकोले शहरात तालुक्याच्या नागरिकांच्या सेवेसाठी रोटरी नेत्र तपासणी केंद्र सुरू केले आहे ही बाब अतिशय महत्वाची आहे.रोटरीच्या या समाजसेवेमध्ये संगमनेर मर्चंट बँकेने व अमोल देशमुख यांनीही या समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. ही बाब कौतुकास्पद व इतरांनीही प्रेरणा घेण्यासारखे आहे असे हभप देशमुख यांनी सांगितले.
यावेळी रोटरी क्लब संगमनेर चे माजी अध्यक्ष रो.ओंकार सोमाणी,आदिवासी विकास प्रकल्प चे सहाय्यक मनोज पैठणकर,माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर , डॉ.उल्हास कुलकर्णी,सतीश बूब,रवींद्र चोथवे,संदीपराव शेटे,सुरेश नवले,अनिल कोळपकर,रामनिवास राठी,साईनाथ साबळे , रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष सचिन देशमुख,सचिन आवारी, डॉ.रवींद्र डावरे,रोटरी आय केअरचे व्यवस्थापक अंकुश आहेर आदींसह संगमनेर मर्चंट बँकेचे सर्व संचालक,स्थानिक सल्लागार,रोटरी क्लब अकोले ,संगमनेर चे सर्व पदाधिकारी व सदस्य,तसेच अकोले शहरातील डॉक्टर्स,व्यापारी,नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत रोटरी क्लब सेंट्रल अकोले चे अध्यक्ष रो. सुनील नवले यांनी केले.प्रास्ताविक रोटरी आय केअर ट्रस्ट ,संगमनेर चे अध्यक्ष संजय राठी यांनी केले.
सूत्रसंचालन अश्विनी काळे- फापाळे आणि रोटरी क्लब चे सेक्रेटरी रो. विद्याचंद्र सातपुते यांनी केले.पाहुण्यांचा परिचय माजी उपप्रांतपाल रो. सुनील कडलग यांनी केले तर आभार रोटरी क्लब संगमनेर चे अध्यक्ष रो. आनंद हासे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरीयन्सनी परिश्रम घेतले.

रोटरी आय केअर ट्रस्ट चे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर,
रोटरी क्लब संगमनेर ,रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या रोटरी नेत्र तपासणी केंद्रासाठी संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने रुपये ७,३५,०००/- किमतीचे रिफ्रॅक्शन युनिट व संदेश चष्माघरचे संचालक अमोल देशमुख यांनी नेत्र तपासणी केंद्रासाठी मोफत जागा उपलब्ध करून देऊन विशेष सहकार्य केल्याबद्दल बँकेचे सर्व पदाधिकारी व संचालक ,सल्लागार ,आणि रो.अमोल देशमुख व सौ.अर्चनाताई देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर दीपक मणियार यांनी रोटरी क्लब अकोले सेंट्रल ला रुपये ९०००/- किमतीची व्हील चेअर सप्रेम भेट दिली.
व आता पर्यंत विविध संस्थांना 35000 च्या वर वृक्ष रोपांचे मोफत वाटप करणारे अकोले रोटरी क्लब चे सदस्य संदीप मालुंजकर यांनी या उदघाटन प्रसंगी मान्यवरांच्या सत्कारासाठी 100 रोपे व गुलाब पुष्प भेट दिली.