इतर

सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणाचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ..!
-आदिनाथ सुतार


अकोले – शैक्षणिक संकुल मवेशी ता. अकोले जिल्हा अहमदनगर येथील इंग्रजी माध्यम आश्रम शाळा राजुर कॅम्प मवेेशी येथे मंगळवार दि. 3 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीम. मेघना खेडकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले जयंती उत्सव पार पडला

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदिनाथ सुतार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमात वेशभुषा, नाट्यीकरण, गायन व अभिनय याद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात आपल्या प्रमुख भाषणात मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार म्हणाले की, वर्षानुवर्ष दुष्काळाची परंपरा लाभलेला आणि मागासवर्गीय म्हणून शिक्षणापासून वंचित असलेल्या शेतकरी कुटुंबात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावाजवळील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडोजी पाटलांच्या घरी 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईं चा जन्म झाला मागासवर्गीय आणि शिक्षण घेणे पाप होती शूद्रांनी शिक्षण घेतले तर ब्राह्मणांचा वैदिक धर्म बुडत होता त्यामुळे सावित्री यांना शिक्षण घेण्याचा प्रश्नच आला नाही. पूर्वी मुलामुलींची लग्ने बारा वर्षाच्या आतच बालवयात करण्याची प्रथा होती.सावित्रीबाईंंचे वय नऊ वर्ष तर ज्योतिबांचे वय तेरा वर्षांचे होते. 1840 मध्ये सावित्रीचे ज्योतिबां बरोबर विवाह पार पडला सावित्री आता सासरी पुण्यात ज्योतीराव फुले यांच्या घरी नांदण्यासाठी आल्या हजारो वर्षे अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजास ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे ज्योतिराव हे पहिले भारतीय क्रांतीकारी महात्मा ठरले तो बहुजनांच्या क्रांतीचा दिवस होता 1847 चा. ज्योतीरावांनी सावित्रीचे अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केली ज्योतिराव आणि सावित्री एवढ्यावरच थांबले नाहीत ज्योतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंज पेठेतील जागेत मुलींची शाळा सुरू केली. या शाळेतील मुलींना शिक्षण शिकवण्याचा पहिला मान सावित्रीबाईंना मिळाला भारतीय स्त्रियांच्या पर्वाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी चार ब्राह्मण एक मराठा एक धनगर सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला पुण्यात ज्योतिरावांनी मुलींची शाळा काढली असून या शाळेची शिक्षिका सावित्री आहे हे समजताच सनातनी ब्राह्मणाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुण्यात ओरड सुरू केली की धर्माप्रमाणे शिक्षणाचा अधिकार नाही त्यांना शिकविणे आणि शिकणे म्हणजे पाप आहे. एवढ्यावरच न थांबता सावित्री शाळेला जाताना दगड मारणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे अनुभव येत होते. अवघ्या चार वर्षात पुण्यात सात शाळा सुरू झाल्या पहिली भिडे वाड्यात दुसरी महारवाड्यात तिसरी चिपळूणकर वाड्यात चौथी नाना पाटील नाना पेठेत पाचवी रस्ता पेठेत सहावी वेताळ पेठेत सातवी पुण्याच्या बाहेर हडपसर , सासवड शिरवळ, तळेगाव, शिरूर, करंजे, भिंगार याठिकाणी शाळा सुरू केल्या सावित्रीने माहेरी सातारा जिल्ह्यात नायगाव येथीही शाळा सुरू केली जन्मभूमीत अज्ञानरुपी अंधारात ज्ञानाचा दिवा लावून सावित्रीने माहेरचे ऋण फेडले यावरच न थांबता ज्योती सावित्रीबाई शेतकरी आणि त्यांच्या बायकांसाठी रात्रीची शाळाही सुरू केली शाळेत ज्योतिराव सावित्रीबाई रोज रोज दोन तास मोफत शिकवत असत या जोडप्याने अंधश्रद्धेचा अज्ञानाचा अंधकार ज्ञानाचा दिवा लावुण नष्ट केला त्यामुळे त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या राष्ट्रपिता, राष्ट्रमाता ठरल्या ज्योतिराव सावित्री मातेने सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली होती 16 नोव्हेंबर 1852 साली पुण्यात विश्राम बागेजवळ फुले दाम्पत्याचा पुण्यातील विद्वान ,शास्त्री मंडळी कलेक्टर यांच्या ऊपस्थितीत मेजर कँडी यांच्या हस्ते सावित्री माता व ज्योतीराव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या साथीने झाला. सामान्य माणसांच्या जीवनात ज्ञानप्रकाश निर्माण करणाऱ्या
राष्ट्रमाता सर्वांना सोडून गेल्या पण त्यांच्या कर्तत्वाचा सुगंध अजुनही दरवळत असुन येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सावित्रीबाईंंचे कार्य एक दिपस्तंभ असल्याचे गौरवोद्गार श्री.आदिनाथ सुतार यांनी आपल्या प्रमुख भाषणात काढले.

कार्यक्रमात श्रीम.लिना पटनाईक, गंभिरे,रिसे या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग शेळके यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री गणेश कोकाटे यांनी मानले.कार्यक्रमास मुलींचा उस्फूर्त प्रतिसाद होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button