शिरूरच्या नगराध्यक्षपदी प्रतिभाताई गाडेकर

उपाध्यक्षपदी देसर्डा यांची निवड
गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
शिरूर नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज सकाळी निवड घोषीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रतिभाताई गाडेकर तर उपाध्यक्षपदी श्वेता देसर्डा यांची निवड करण्यात आली.यामध्ये मतदान झाले असून भाजपाच्या उमेदवाराला ११ मते पडली. शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी तटस्थ राहणे पसंत केले.
शिरूरच्या नगरपंचायतीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून अध्यक्षपदी प्रतिभाताई गाडेकर (पाटील) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांची निवड झाली.उपाध्यक्षपदी श्वेता प्रकाशसेठ देसर्डा यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान भाजपाचे ११, राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेचे २ नगरसेवक निवडून आलेले आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर होताच त्यांचे आ. सुरेश धस सह आदींनी अभिनंदन केले.