डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात ‘ डिजिटल माध्यम साक्षरता’ यावर व्याख्यानमाला .

आकुर्डी ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिःशाल शिक्षण मंडळ आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने बॕ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आणि यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला या दोन व्याख्यानमाला पार पडल्या.
बॕ. जयकर या व्याख्यानमाले अंतर्गत प्रा. ज्ञानेश्वर जाधवर यांचे ‘ डिजिटल माध्यम साक्षरता’ या विषयावर व्याख्यान झाले तर यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले अंतर्गत डाॕ. रूपा शहा मॕडम यांचे ‘ व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रा. जाधवर यांनी समाज माध्यमातील वास्तवता सांगतानाचा समाजमाध्यमाबाबत जागृत कसे राहावे हे सांगितले. तर डाॕ. शहा यांनी आपले अंतर बाह्य व्यक्तित्व कसे सुधारावे तसेच पेहराव, बोलणे आणि वागणे आपले कसे असावे याबाबत मार्गदर्शक केले. दोन्ही व्याख्यानमालेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे होते. त्यांनी या दोन्ही व्याख्यानमाला आयोजनाचा हेतू व उद्देश सांगितला. कला शाखाप्रमुख प्रा. गणेश फुंदे व वाणिज्य शाखाप्रमुख डाॕ. विजय गाडे यांनी प्रास्तविक केले.
या व्याख्यानमालेच्या समन्वयक प्रा. स्वप्नाली बिरनाळे सूत्रसंचालन केले तर प्रा. भागवत देशमुख यांनी आभार मानले. या व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.
