श्री बाळेश्वर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार या विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके, पर्यवेक्षक सुनील साबळे शिक्षक व सावित्रीबाई बनलेल्या विद्यार्थिनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयामध्ये यावेळी अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई ज्योती बनल्या होत्या . या सर्व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई ज्योती यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. काही विद्यार्थिनींनी मी क्रांतीज्योती बोलते असेही भाषणे केली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके बोलत होते भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्य पुरस्कत्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती काळाच्या फार पुढे असलेल्या एका कर्तुत्व संपन्न स्त्री चे आदरपूर्वक केलेले हे स्मरण .क्रांतीज्योती सावित्रीबाई 1848 ते 1897 अशी सलग पन्नास वर्षे लोकांसाठी राबत होत्या सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह ,सत्यशोधक, विवाह गरीब मुलांचे संगोपणाने ब्राह्मण विधवांच्या केसवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडवणे या चार कामात सावित्रीने आपली नेतृत्व केले. आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाचे सुरुवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करत आणि शिव्या शाप शांतपणे ऐकत सावित्रीबाईंनी आपले काम केले. शिक्षण, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय या विषयाचे सावित्री ज्योती यांचे समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचे दिसून येते
या कार्यक्रम प्रसंगी गंगाधर पोखरकर, तुकाराम कोरडे ,अशोक जाधव, विश्वास पोखरकर, संतोष भांगरे, श्रीकृष्ण वर्पे,सोमनाथ सलालकर, नारायण डोगरे ,रघुनाथ मेंगाळ, हेमंत बेनके, बाळासाहेब डगळे, संजय ठोकळ, विठ्ठल फटांगरे, आप्पासाहेब दरेकर, भाऊराव धोंगडे, मंगेश औटी, गणपत औटी, मनोहर कचरे ,मोहन वैष्णव आधी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का लंके हिने केले.