आजचे पंचांग व राशिभविष्य दि २८/०६/२०२३

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०७ शके १९४५
दिनांक :- २८/०६/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्कपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २७:१९,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति १६:०१,
योग :- परीघ समाप्ति ०६:०८, शिव २९:१५,
करण :- तैतिल समाप्ति १५:१९,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३२ ते ०२:११ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०५:५७ ते ०७:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:३६ ते ०९:१५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:३२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२९ ते ०७:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
मन्वादि,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०७ शके १९४५
दिनांक = २८/०६/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आज दिवस मजेत घालवा. राशीतील गुरू प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.
वृषभ
व्यय राहू गुरू संभ्रम निर्माण करेल. काही आनंदाचे प्रसंग देखील येतील. खुश रहा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. दिवस सुखद.
मिथुन
पंचम स्थानात चंद्र आहे. काही कारणाने तणावात टाकणारे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कोणालाही उधार देणे टाळा. कार्य करताना विचार करा. संतती आनंदी राहील. व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.
कर्क
दशम गुरू आणि चंद्र चतुर्थ स्थानात नोकरीत आर्थिक विकास करेल. वैवाहिक जीवन मध्यम आहे. व्यवसायात लाभ होईल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा. दिवस बरा.
सिंह
आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ आहे. गृह-सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिकदृष्ट्या दिवस उत्तम.
कन्या
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.
तूळ
शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. संततीकडे लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक
मंगळ कर्क राशीत वृश्चिक व्यक्तींना प्रवास योग आणेल. प्रयत्नपूर्वक शांत रहा. नैराश्याचा झटका येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. व्यय चंद्र गृह सौख्य, नोकरी यासाठी मध्यम फळ देईल.
धनू
चतुर्थ गुरू राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील. कुठल्याही संकटातून मार्ग काढाल. पंचम गुरू व लाभ चंद्र योग घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लिखाणमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.
मकर
राशीच्या दशम स्थानात चंद्र नवीन संधी प्राप्त करून देईल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.
कुंभ
राशीतील शनी आणि भाग्य चंद्र शुभ असून व्यवसायात जपून, असा असे संकेत देत आहे. षष्ठ शुक्र घरात ताण असून सामाजिक जीवनात लाभ देईल. दिवस उत्तम.
मीन
राशी स्वामी शुभ आहे. गुरू उपस्थितीमुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. दिवस मध्यम. शुभ भवतू!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर