ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वीज कामगारांचा संप मागे

मुंबई दि ४
कंत्राटी वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता, परंतु आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा देवेंद्र फडणवीस व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, संयुक्त कृती समिती पदाधिकारी , महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सह्याद्री विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने वीज कामगारांनी संप मागे घेतला
. या वेळी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भुमिका घेवून कामगारांना निश्चितच न्याय देवू असे ठोस आस्वासन ऊर्जामंत्री यांनी दिले आहे. त्यामुळे आज रात्री पासून सुरू झालेला संप मागे घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मा देवेंद्र फडणवीस यांना कंत्राटी कामगार संघांचे वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्री नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, संघटनमंत्री उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, प्रादेशीक अध्यक्ष संतोष अंबड, पुणे झोन संघटनमंत्री सुधीर जगताप उपस्थित होते.
