महिलांचा सन्मान हाच संविधानाचा सन्मान

नाशिक/ प्रतिनिधी
(डॉ शाम जाधव )
भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणजेच संविधानाचा सन्मान करण्यासाठी दिनांक २८ जानेवारी रोजी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ येथे तिळगुळ व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांना तिळगुळ व हळदीकुंकू देऊन सन्मान करण्यात आला

तसेच यानिमित्ताने महिलांनी विविध खेळांचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका शितल राठोड ,डॉ.अर्चना झोटिंग स्वरूपा पवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जानवी पाटील, प्रा.वंदना इंगळे, मंजिरी पाटे, नम्रता कायस्थ, वर्षा बोरसे, ललिता पवार, धनश्री शेळके, कविता गायकवाड ,मीना पाठक व सुरेखा धीवर यांनी केले होते.
महिलांचा कार्यक्रम समाप्तीनंतर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांना मंत्रालय वार्ताच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी समितीच्या कामकाजाबद्दल राष्ट्रीय प्रवक्ता डॉ.साहेबराव निकम यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय सचिव डॉ.अविनाश झोटिंग डॉ.माया पठाडे, सचिन पवार, योगेश निकम, प्रा.शिवलाल पगार, प्रकाश बोराडे, प्रा.निलेश दुसे ,स्वप्निल जाधव, श्रीजीत वारियर, गायत्री बिरारी, प्रांजली गायकवाड, अनिता पंडित, शीला लोहारे, सुनिता खाडे, दिपाली खरात ,दुर्वा परदेशी, वंदना बागुल, विनोद बिरारी, राहुल निरभवणे,व समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.