आजचे पंचांग व राशिभविष्य दि.7/01/2023

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १७ शके १९४४
दिनांक :- ०७/०१/२०२३,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २१:०८,
नक्षत्र :- पुनर्वसु समाप्ति २७:०८,
योग :- ऐंद्र समाप्ति ०८:५४,
करण :- बालव समाप्ति १७:५२,
चंद्र राशि :- मिथुन,(२०:२४नं. कर्क),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पू.षा.,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स.०९प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:५० ते ११:१३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२७ ते ०९:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५८ ते ०३:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२१ ते ०४:४४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १७ शके १९४४
दिनांक = ०७/०१/२०२३
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
आजचा दिवस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत घालवाल. आज तुमचा काही बाहेरील लोकांशी संपर्क होण्याची शक्यता. त्याचा तुम्हाला फायदा होईल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर घाईघाईने घेऊ नका.
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. नात्यांमध्ये गोडवा येईल.
मिथुन
पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जर तुम्ही याआधी कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करू शकाल. कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या प्रिय आणि मौल्यवान गोष्टींबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. काही नवीन लोकांशी सुसंवाद वाढवून तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या सहज सोडवू शकाल.
कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मेहनतीचा असेल. तुम्ही कठोर परिश्रम कराल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. विचारपूर्वक आणि संयमाने बोला. तुमच्या घरातील बाबी बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका. तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळेल.
सिंह
आज तुम्ही काही धार्मिक कार्याशी निगडीत असाल तर त्यामुळं तुमचा आदर वाढेल. मनात नकारात्मक विचार आणणे टाळा. सुख-समृद्धी वाढल्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील. चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करणे टाळा. कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात आणू नका. अविवाहितांना चांगले वैवाहिक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
कन्या
आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीला बळ देणारा राहिल. आज काही नवीन योजना करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल. कोणावरही अवलंबून राहू नका. कुटुंबातील कोणताही सदस्य विवाहासाठी पात्र असेल तर आज त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.
तुळ
वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या गोष्टीवरून तुमच्यात मतभेद होत असतील तर ते आज मिटतील. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीकडे पूर्ण लक्ष द्याल आणि त्यासाठी काही पैसेही खर्च कराल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. रखडलेली कामं आज सहज पूर्ण होतील.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणारा असेल. सध्याच्या परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या निवृत्तीमुळं त्यांच्यासाठी आज सरप्राईज पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल.
धनु
धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सन्मानात वाढ करेल. जर तुम्हाला एखादं नवीन काम, व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे आज वातावरण प्रसन्न राहील.
मकर
मकर राशींच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता असेल. तुमची काही कामे आज न झाल्यामुळं निराशा येण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊ शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या विवाहात काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील.
कुंभ
आज तुम्हाला कोणतेही काम करताना काही अडचण येणार नाही. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्यांना आज मोठी ऑर्डर मिळू शकते. कोणतेही काम जबाबदारीने करा.
मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुम्ही तुमच्या काही जुन्या मित्रांना भेटाल. गुंतवणूक करताना विचार करा. आज कोणतेही काम पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर