इतर

पारनेर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेची गटेवाडी येथवश्रम संस्कार शिबीर सुरू !

श्रम संस्कार शिबिरातुन स्वतःला सिद्ध करता येते
सरपंच सौ.मंगल गट

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :

समाजाप्रती बांधीलकी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या समाज उपयोगी उपक्रमा मध्ये स्वतः ला सिद्ध केले पाहीजे अशा प्रकाराच्या शिबिरातुन विविध कला गुणांचा विकास होतो आपल्या मध्ये सक्षम पणा निर्माण होतो आपल्या भविष्याची स्वप्न साकार करण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग होतो हा फायदा व उद्देश लक्षात घेऊन काही तरी मिळविण्यासाठी व समाजा मध्ये स्वतः चे स्थान निर्माण करण्यासाठी कष्टाच्या जोरावर आपण करू शकतो व अशा प्रकारच्या कष्टामधुन जिवणाचा आनंद मिळतो व राष्ट्रीय सेवा योजनेमुळे नैतिक मुल्यांचा विकास देखील होतो असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायंन्स कॉलेज पारनेर आयोजीत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीराच्या प्रसंगी सौ गट बोलत होत्या.

 

या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य .डॉ . रंगनाथ आहेर होते.ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हनाले की सुत्रसंचालनयात प्रत्येक गोष्ट मनापासुन केली पाहीजे कारण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन अनेक जीवनाला दिशा देणाऱ्या लहान लहान गोष्टी शिकता येतात आणि आपण केलेल्या कामातुन आनंद मिळतो कारण महाविद्यालयीन विद्यार्थि आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इत्तर आपल्या मध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा शिवीरात सहभागी झाले पाहीजे व एकीची भावना देखील वाढीस लावली पाहीजे चांगल्या प्रकारचा संदेश देखील समाजामध्ये दिला पाहीजे वाईट प्रवृत्ती समुळ नष्ट कण्यासाठी आवाज उठवला पाहीजे असे मत या निमीत्ताने मांडले.
या उद्घाटन प्रसंगी पारनेर दूध संघाचे मा व्यवस्थापक श्री ज्ञानदेव गट साहेब सुनिल पवार ( उपसरपंच) चंद्रकांत गट , रावसाहेब गट, किरण गट विलास ठाणगे किरण उत्तम गट , डॉ दत्तात्रय घुंगार्डे, प्रा . संजय आहेर श्रीमती अशा गट , तंटामुक्ती अध्यक्ष संदीप धोंडीभाऊ गट मेजर , गोरख गट, समस्थ ग्रामस्थ तसेच व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठया प्रमाणात हजर होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अशोक घोरपडे यांनी केले अभार प्रा . प्रतिक्षा तनपुरे यांनी मानले व सुत्रसंचाल प्रा . संजय आहेर यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button