समाजाच्या उन्नतीसाठी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी – – प्रा.डाॕ.लक्ष्मण कोठावळे

श्री बाळेश्वर विद्यालय, विद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व्याख्यानमाला
संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे, श्री बाळेश्वर अनुदानित आश्रम शाळा व श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार. या विद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व्याख्यानमाला व राजमाता जिजाऊ साहेब जयंती असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राजर्षी शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.डॉ.लक्ष्मण कोठावळे,प्रा. डॉ. हरेश शेळके, प्राचार्य चंद्रकांत शिरोळे,प्राचार्य रमेशचंद्र बेनके, मुख्याध्यापक सुदाम पवार, पर्यवेक्षक सुनील साबळे व शिक्षक यांनी प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. लक्ष्मण कोठावळे बोलत होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेची सर्वसामान्य गरीब व बहुजनांना शिक्षणाची द्वारे उघडी करण्याच्या उद्देशाने स्थापना झाली. राजर्षी शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाचे शिक्षण, त्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजात समानता निर्माण करणे यासाठी वेचले. तत्कालीन शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी निवासाची व्यवस्था नव्हती याकरिता राजर्षी शाहू महाराजांनी अनेक वस्तीगृह सुरू केली. अहमदनगर येथे सुरू झालेले मराठा बोर्डिंग हे त्याचेच उदाहरण त्यांचे रूपांतर पुढे रेसिडेन्सील हायस्कूल अहमदनगर यामध्ये झाले.राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन भेदभाव दर्शविणारे वतने रद्द केले. अनेकांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करून दिले .
कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची व्यवसाय पेठ त्यांनी उभी केली.सिंचनासाठी राधानगरी हे भव्य धरण बांधले. धाडस ,वक्तृत्व शैली, कृतिशील विचार, आदर ही चतुसूत्री राजांकडे होती.शाहू महाराज नसते तर आपण शिक्षण घेऊ शकलो नसतो. व्यायाम करणे शिकार करणे हे सुद्धा गुण महाराजांमध्ये होते. एकदा महाराज शिकार करण्यासाठी आपल्याबरोबर पारधी समाजाचा एक तरुण मुलगा घेऊन गेले होते तेव्हा त्या पारधी समाजाच्या मुलाने महाराजांना ससा पकडून दिला. त्याचीच परतफेड म्हणून राजाने पारध्याच्या मुलाला आपल्या शेजारी जेवायला बसवले. नैतिक मूल्य असणारा राजा म्हणजे शाहू महाराज. आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी महापुरुषांची पुस्तके वाचली पाहिजेत. राजांनी ज्या व्यक्तीला चहाचे हॉटेल टाकून दिले तेथे राजे स्वतः चहा प्यायला जात. राजांची ख्याती अगदी साता समुद्रापारही होती .इंग्लंडची राणी एलिझाबेथ ज्यांचे अलीकडे निधन झाले त्यांनी राजांना आपल्या पदग्रहण सोहळ्यासाठी इंग्लंडला आमंत्रित केले होते.राणीने शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली त्यांचे सर्व कार्य आजही आपणास प्रेरणादायक आहे. यामुळे त्यांना लोकराजा या नावाने आपण सर्वजण ओळखतो. राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती आहे ज्या मातेने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला.स्वराज्याची प्रेरणा महाराजांमध्ये भिनवली रयतेचे राज्य कसे असावे त्यासाठी काय करावे या सर्वांचे शिक्षण आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले.खरंतर राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रत्येक कृतीतून आपणास खूप काही शिकता येईल.जसे की बालपणी शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी रामायण व महाभारतातील गोष्टी सांगितल्या त्यातून महाराजांमध्ये धाडस,मातृभूमी विषयी प्रेम निर्माण केले रयतेची बांधिलकी व महिलांचा सन्मान ही शिकवण महाराजांना आऊसाहेबांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी राजेश सांगळे ,संजय पालवे,रविंद्र आगलावे,विलास लोंढे,उषा लोहटे,राजाराम बांबळे,अनिता भागवत, शिवाजी थिटमे,जालिंदर मुळे,अरूण धावणे, जनार्धन घोडे, गंगाधर पोखरकर,तुकाराम कोरडे,विश्वास पोखरकर, भाऊराव धोंगडे, संतोष भांगरे,बाळासाहेब डगळे, संजय ठोकळ, हेमंत बेनके, भारत हासे, सोमनाथ सलालकर, श्रीकृष्ण वर्पे, आप्पासाहेब दरेकर, विठ्ठल फटांगरे ,मंगेश औटी, मोहन वैष्णव, गणपत औटी, मनोहर कचरे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन रघुनाथ मेंगाळ यांनी केले