इतर

अमृतसागर दुध संघ निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड यांच्या गटाने आमदार लहामटे गटाला धूळ चारली!

अकोले:प्रतिनिधी
अकोले तालुक्यात दूध उत्पादकांची शिखर संस्था असणाऱ्या अमृतसागर दूध संस्थेत माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पॅनलचा या निवडणुकीत सपाटून पराभव झाला पिचड गटाने लहामटे गटाचा १३ विरुद्ध २ असा धुव्वा उडवला , राजुर ग्रामपंचायत निवडणुकीत आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील पराभवाचा वचपा पिचड गटांने या निवडणुकीत काढला

अकोले तालुक्यातील अमृतसागर दुध संघात वैभवराव पिचड यांच्या गटाने पुन्हा गड राखला आहे महाविकास आघाडी विरुद्ध पिचड यांच्या भाजप समर्थकांचा लढा या दूध संघाच्या निवडणुकीत दिसून येत होता यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत १५ पैकी अवघ्या २ जागा महाविकास आघाडी प्रणित लहामटे- गायकर यांच्या गटाला मिळाल्या .तर पिचड यांनी १३ जागा वर विजय मिळवत आपला गड कायम राखला १५ जागांसाठी ३०उमेदवार रिंगणात उभे होते. आज रविवारी दि ८ रोजी १०० टक्के मतदान झाले सर्व १३० मत दारांनी मतदान केले आणि आजच सायंकाळी निकाल ही जाहीर करण्यात आला

अकोले तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असणार्‍या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या निवडणूकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड ,वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळ अशी सरळ लढत झालीअवघ्या तासाभरात या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला.निकाल घोषित होताच भाजप कार्यकर्ते व माजी आमदार मधुकर पिचड यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सरकारी संस्था (दुग्ध) दीपक पराये यांनी काम पाहिले.
त्यांना सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर व दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी सहाय्य केले

यामध्ये अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी विजय संपादन केला.

पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाचे अन्य विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-

सर्वसाधारण मतदार संघ-
आप्पासाहेब आवारी (80) रामदास आंबरे (66), अरुण गायकर ( 64)बबन चौधरी (69), सुभाष डोंगरे (73) जगन देशमुख( 66,)गंगाधर नाईकवाडी( 65,) रावसाहेब वाकचौरे (76)

विरोधी आमदार डॉ किरण लहामटे -गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्वसाधारण गटातुन-
गोरक्ष मालुंजकर( 71) व शरद चौधरी (66) हे दोन च उमेदवार विजयी झाले.

महिला राखीव –सुलोचना भाऊसाहेब औटी (75)
अश्विनी प्रविण धुमाळ( 79)

इतर मागासवर्ग – आनंदराव वाकचौरे( 81) भटक्या विमुक्त जाती जमाती – बाबूराव बेनके( 75) हे विजयी झाले

प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये अमृतसगर दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, माजी संचालक सोपान मांडे, सुभाष बेनके, अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव शेवाळे,उद्योजक सुरेश गडाख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे आदी उमेदवारांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button