इतरग्रामीण

कॉ.बाबा आरगडे गौरवग्रंथ साठी लेख पाठविण्याचे शब्दगंध चे आवाहन ”


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


पुरोगामी विचारांची कास धरून बाबुराव भानुदास तथा कॉम्रेड बाबा अरगडे यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीमध्ये सातत्याने सहभागी होऊन शेवटच्या माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.कॉम्रेड बाबा आरगडे आता उत्तरार्धात प्रवेश करत आहेत.हे औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने “ कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ “ प्रसिद्ध करायचे ठरवलं आहे.यासाठी कॉ.बाबा आरगडे यांच्या समवेतच्या आठवणी, फोटो व लेख संकलित करण्याचे काम सुरू केले असून “ कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ “ साठी आपल्या आठवणी,लेख पाठवावेत,” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.


त्यांनी कॉ.आण्णाभाऊ साठे,शाहिर जंगम स्वामी,शाहिर अमर शेख,डॉ.नरेंद्र दाभोळकर, डॉ,श्रीराम लागू, निळू फुले,सदाशिव अमरापूरकर यांच्या समवेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक यशस्वी लढे लढलेले आहेत.कॉम्रेड गोविंदभाई पानसरे, कॉम्रेड वकीलराव लंघे, कॉ.बाळासाहेब नागवडे,कॉ.नामदेवराव आव्हाड,दत्ता देशमुख,मधुकर कात्रे या जेष्ठांसमवेत काम केलेले असुन आजही कष्टकऱ्यांसाठीची रस्त्यावरील लढाई ते लढत आहेत.बाबा आढाव, शंकरराव घुले, आप्पा कोरपे यांच्या समवेत सुरू केलेले कष्टकरी हमाल पंचायत चे कार्य आजही चालू आहे. बिडी कामगारांचे नेते कॉ.राम रत्नाकर, शंकरराव न्यायपेल्ली, लाल निशांन चे कॉ.भास्करराव जाधव, मा.आ.कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या समवेतही त्यांनी काम केलेलं आहे.
हमाल पंचायत,इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ,राज्य हमाल मापाडी महामंडळ, किसान सभा,भाकप यामध्ये कार्यरत असलेले कॉ.बाबा आरगडे समाजहिताच्या गोष्टी आजही करत आहेत.समाजासाठी अविरतपणे काम करत असलेला हा सामान्य माणूस अनेकांसाठी असामान्य ठरलेला आहे.अनेक सामाजिक वाद-विवादासोबतच वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्नही त्यांनी सोडविलेले आहेत.कॉम्रेड बाबा आरगडे आता उत्तरार्धात प्रवेश करत आहेत.हे औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने “ कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ “ प्रसिद्ध करायचे ठरवलं आहे.यासाठी कॉ.बाबा आरगडे यांच्या समवेतच्या आठवणी, फोटो व लेख संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.शब्दगंध च्या वतीने लवकरच गौरवग्रंथ संपादन समिती स्थापन करण्यात येणार आहे. आपले साहित्य सुनील गोसावी,शब्दगंध,फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,भिस्तबाग महाला जवळ,तपोवन रोड,सावेडी,अहमदनगर -४१४००३ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे,असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, भगवान राऊत, हरिभाऊ नजन, दिगंबर गोंधळी, पॉल भिंगारदिवे, आनंदा साळवे, पत्रकार शहाराम आगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button