इतर

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमध्ये समाज बदलविण्याची ताकद ! राहुल झावरे

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
गटेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा समारोप मोठ्या उत्स्थाहात पार पडला .समाज परिवर्तनाची खरी ताकद युवकांमध्ये आहे कारण युवक आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपणामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर नवचैतन्य निर्माण करू शकतात व युवकांमध्ये जगण्याचे भान व सामर्थ्य मिळून देण्यासाठी तसेच आयुष्य अगदी आनंदी होण्यास हातभार लागला जातो. असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी मा.सभापती झावरे बोलत होते .
पुढे बोलताना सभापती झावरे म्हणाले श्रमदान ,स्वयंशिस्त, जबाबदारीची जाणीव, समूह संघटन ,नीटनेटकेपणा, याचबरोबर आत्मविश्वास युवकांमध्ये उंचविण्याचे काम अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरातून होत असते कारण अशा प्रकारच्या शिबिरातून युवकांना ग्रामीण भारत कळतो व जगण्याचे भान देखील कळते तसेच आयुष्य अगदी आनंदी होण्यास देखील मदत होते शिबिरातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य देखील स्वयंसेवकांच्या हातुन होते कारण समाज परिवर्तन झाले व चांगला संदेश लोकांपर्यंत गेला तरच खऱ्या अर्थाने ग्राम व शहर विकास पूर्ण होण्याचे स्वप्न साकार होईल असे मत सभापती झावरे यांनी मांडले .
या शिबिर समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राणीताई लंके ( जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर ) या उपस्थित होत्या . त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की अशा प्रकारच्या श्रम संस्कार शिबिरात मुलांनप्रमाणे मुली देखील सहभागी होतात समाजामध्ये मुलींबाबत असणारा गैरसमज दूर होण्यास खऱ्या अर्थाने मदत होईल व अशा शिबिरातून ग्रामीण भाग कसा आहे याचे खऱ्या अर्थाने दर्शन महाविद्यालयीन तरुणांना होईल व महाविद्यालयीन तरुणांमध्ये स्वयंशिस्त तसेच समाज या सर्व गोष्टींची जाणीव जागृती अशा प्रकारच्या शिबिरातून होईल असे मत मांडले .
या श्रमसंस्कार शिबिरात गटेवाडी येथे ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, समतलचर, व्यसनमुक्ती ,ग्राम संरक्षण ,आरोग्य तपासणी, जाणीव जागृती ,मतदार जागृती, असे उपक्रम हाती घेण्यात आले.या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर ,अंकुश रोकडे (उपसरपंच रायतळे ) ,महेश शिरोळे( विश्वस्त खंडोबा देवस्थान ) सरपंच. सौ मंगल ताई गट, राजेंद्र वाबळे चेअरमन वि .का. सेवा सोसायटी ) श्री कारभारी बाबर (संचालक शिक्षक बँक अहमदनगर ) तसेच स्वयंसेवीका गौरी पाठारे ,आम्रपाली ढवण, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शिबिर प्रसंगी मा.श्री .सूर्यकांत काळे (संचालक शिक्षक बँक अहमदनगर ) मा . श्री प्रभाकर भालेकर (विकास मंडळ सदस्य ) श्री ज्ञानदेव गट साहेब, संदीप गट ,किरण गट ,सखाराम गट ,नामदेव गट ,भूषण गट मेजर, गोरख गट , राहुल डावखर, अशोक पवार ,गौतम गट, ( माजी सरपंच ) कार्यक्रम अधिकारी डॉ . अशोक घोरपडे प्रा .संजय आहेर प्रा .प्रतीक्षा तनपुरे डॉ . दत्तात्रय घुंगर्डे मा . श्री गणेश झावरे व राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छत्र सेने चे स्वयंसेवक व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजर होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संजय आहेर यांनी केले तर आभार चंद्रकांत गट सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button