इतर

खामगाव येथील सार्थक रासकर याचे सुयश

नेवासा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील खामगाव येथील रासकर कुटुंबातील विद्यार्थी कुमार सार्थक दत्तात्रय रासकर याने औरंगाबाद येथे पार पडलेल्या विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थ नगर औरंगाबाद आयोजित माननीय कैलासवासी पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऑनलाईन व ऑफलाईन राज्यस्तरीय भक्ती गीत गायन स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तरी त्या स्पर्धेमध्ये कुमार सार्थक दत्तात्रय रासकर याने द्वितीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले असून त्यावर खामगाव व खामगाव परिसरातून व नेवासा तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये सार्थक ला मार्गदर्शक म्हणून लाभलेले गायन सम्राट प्रकाश जी महाराज कातकडे गुरुजी आणि रामकृष्ण महाराज काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button