नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीसाठी शेवटच्या 29 उमेदवारांचे 44 नामनिर्देशन पत्र दाखल

नाशिक प्रतिनिधी
: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी गुरुवारी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून दि.10, 11 व 12 जानेवारी या तीन दिवसात 29 उमेदवारांनी एकूण 44 नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे
, असे उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ श्री रमेश काळे यांनी सांगितले.
आज गुरुवारी नितीन नारायण सरोदे, संजय एकनाथ माळी, राजेंद्र दौलत निकम यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार यांनी (हिंदूस्तान जनता पार्टी ) पक्षाकडून, भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
रतन कचरु बनसोडे यांनी (वंचित बहुजन आघाडी) डॉ. सुधीर सुरेश तांबे, पोपटराव सीताराम बनकर, बाळासाहेब घोरपडे, अविनाश महादू माळी, इरफान मोहमंद इसाक, सुनिल शिवाजी उदमळे यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
सुभाष राजाराम जंगले व अमोल बाबासाहेब खाडे यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते यांनी (भारतीय जनता पक्षातून) नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच सत्यजित सुधीर तांबे यांनी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष) म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शरद मंगा तायडे यांनी बहुजन समाज पार्टी या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत.
राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे, धनराज देविदास विसपुते, छगन भिकाजी पानसरे अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.