इतर

अकोले तालुक्यातील विठा ,म्हाळादेवी ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार!

ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक.

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा, विठा , म्हाळादेवी या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी नागरिकांना स्वच्छ, संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरनात आरोग्य सुविधा देत,आपल्या कामात सातत्य ठेवून सन २०२१_२२ या कालखंडात केलेल्या उत्तम कामगिरीतून ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राला जिल्ह्यात शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाचे नामांकन झाले .तर विठा,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. शासनाकडून निर्धारित केलेली मानक पूर्ण करून ब्राम्हणवाडा,विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राने स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रित करत या कामात सातत्य ठेवून नागरीकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरनात उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या आहेत. येथील आरोग्य आधीकारी तसेच कर्मचारी ,आशा सेविका यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार व विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राने प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला आहे.या पुरस्काराने ब्राम्हणवाडा,विठा ,म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या उत्तम प्रतीच्या सेवेचा आदर्श जिल्ह्यात निर्माण केल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सन २०२१_२२ साठी अहमदनगर जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन हे राज्य स्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार केलेल्या चेकलिस्ट प्रमाणे करण्यात आले होते. यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कारात प्रथम क्रमांक तर विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागात उल्लेखनीय प्रगती होत असून आरोग्य आधीकारी ,कर्मचारी यांचे मार्फत उत्तम कामगिरी बजावली जात असल्याचे दिसून येतं आहे.

   

देशात महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली.नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात.तसेच या संस्थांमधील आरोग्य आधीकारी आणि कर्मचारी यांनी या कामामध्ये सातत्य ठेवावे.तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविली जात आहे.यामध्ये तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये मानधन तसेच मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळणारं आहे.तसेच विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कार मिळाल्याने प्रति पन्नास हजार रुपये मानधन ,मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळणारं आहे.

यादरम्यान अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड,रा.काँ.सचिव सचिन नरवडे,मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर,जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.सांगळे तसेच पठार भागतील सरपंच सुभाष गायकर,नितीन डुंबरे, प्रनेश शिंगोटे, बाळासाहेब फापाळे,योगेश महाले ,ज्योतीताई जगताप,संगीता महाले,पो.पाटील शिवाजी फापाळे,भगवान काळे,राहुल लांडे, राजेन्द्र गवांदे,सुभाष लांडगे,कमलेश गांधी,निलेश गवांदे, डॉ .योगेश फापाळे सुरेश फापाळे,विकास महाले,प्रदीप पवार,इंजी.संतोष फापाळे बजरंग दल ब्राम्हणवादा पठार भागातील आदी ग्रामस्थांनी ब्राम्हणवाडा , विठा,म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी व ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचे डॉ. भारत ताले, डॉ.सोनवणे .बी. टी. कर्मचारी व आरोग्य सेवक,सेविका तसेच आशा सेविका यांचे तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करत केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button