शिका ”ऑनलाईन माध्यमातून ”..मोफत’ कॅलिग्राॅफी (हस्ताक्षरकला)
.
पद्मशाली सखी संघम चा
श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त
अनोखा उपक्रम..
सोलापूर – प्रत्येकांचे अक्षर वेगवेगळे असतोच. ज्यांचं अक्षर सुंदर असेल त्यांना समाजात वेगळीच ओळख मिळतो. कॅलिग्राॅफी (हस्ताक्षरकला) ही एक कला असून ते आत्मसात केल्याने व्यवसाय किंवा शौकीन म्हणूनही साध्य करता येते. पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघमच्या वतीने सोलापूरकरांसाठी मोफत (विनामूल्य) ऑनलाईन सोय करून देण्यात येत आहे, अशी माहिती सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे आणि सचिवा ममता मुदगुंडी यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
सर्वांसाठी मोफत (विनामूल्य) असलेल्या कॅलिग्राॅफी (हस्ताक्षरकला) शिका ‘ऑनलाईन’ असून रविवार, १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता गुगल मीट या ॲपवर श्री. रामचंद्र दुस्सा हे शिकवणार आहेत. कॅलिग्राॅफी आणि फिक्स ऑर्टच्या सहाय्याने श्री. दुस्सा यांनी हस्ताक्षर (कॅलिग्राॅफी) लिहले आहे. ते सर्व पोस्ट सध्या सोशल मिडीयात तुफान वायरल होत आहेत. व्हॉटस्ॲप हाताळणारे प्रत्येक व्यक्ती त्यांचे पोस्ट स्वतःच्या स्टेटसला हमखास जोडतात. त्यांच्या इतर पोस्ट पाहण्यासाठी ‘इन्स्टाग्राम’वर पाहता येईल.
अशा अनोखा विनामूल्य उपक्रम असलेल्या ‘कॅलिग्राॅफी (हस्ताक्षरकला) शिका’ मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी व्हावेत, तसेच अधिक माहितीसाठी
(87889 70814 / 91759 88940) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, खजिनदार प्रभावती मद्दा, सहखजिनदार ममता तलकोकूल यांनी केले आहे.
विशेष सूचना – गुगल मीट ॲप डाउनलोड करून घ्या. सोबतच्या लिंकद्वारे सहभागी होऊ शकता. 👉http://meet.google.com/cry-dcrg-dun
शिकण्यासाठी सोबत – १०० पानी दुरेघी वही, Pilot gel pen, किंवा Trimax pen..किंवा शाईचे निब पेन हे साहित्य लागणार आहेत.