आ.लंके यांच्या माध्यमातुन विकासाचा अनुशेष भरून काढला ! नगरसेवक भूषण शेलार

दत्ता ठुबे/पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहरातील गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत अस्तित्वात असतानाही माजी आमदार विजयराव औटी यांचा प्रभाव असणाऱ्या व त्यांच्या घरातील उमेदवार नेहमीच या वार्डामध्ये नेतृत्व करत असताना तसेच ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यानंतर मा. आमदार औटी यांचे चिरंजीव अनिकेत औटी यांनी या प्रभागात निवडणूक लढवत उपनगराध्यक्ष पद स्वतःकडे घेतले असतानाही या प्रभागात शहर होऊनही रस्त्यांचे व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न तसेच प्रलंबित राहिले होते . परंतु नगरपंचायत निवडणूक 2022 मध्ये आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली एक सामान्य कुटुंबातील मुलगा भूषण शेलार हे घराणेशाहीच्या विरोधात उभा राहत प्रचंड मताधिक्य घेत निवडून आले या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून एक वर्षातच प्रभाग क्रमांक आठ मध्ये विकासाचा डोंगर उभा करून सार्वभौम विकासाची झलक दाखवून दिली आहे .
प्रभाग क्र . ८ मध्ये वरची वेस ते मराठी मुलांच्या शाळेच्या शेवटच्या टोकापर्यंत बंदिस्त गटारचे २५० मीटर काम काम पूर्ण करत,अब्बास आत्तार घर ते सुलाबाई शेलार घरापर्यंत ३० मी सिमेंट काँक्रेट रस्ता पूर्ण केला व प्रभागांमध्ये बरेच ठिकाणी रस्त्यांची डागडूजी, तसेच महादेव गल्लीमधील अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेली पाईपलाईन दुरुस्त करून त्या ठिकानी असलेला अनेक वर्षापासूनचा प्रलंबित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुरळीत करून दिला .
नगरसेवक भूषण शेलार यांनी प्रभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी स्वखर्चाने पथदिवे बसवले आहेत .परिवाराला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी किंवा पाठबळ नसताना आ.लंके यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन ही अपक्ष निवडून लढविली होती . व विजयानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून नगरपंचायत वर सत्तेत सहभागी झाले . आ. निलेशजी लंके साहेब यांच्या सोबतीने प्रभाग ८ मध्ये विकास कामांची मालिका अखंडीत सुरू ठेवली .प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या निश्चयावर ठाम असणाऱ्या युवा नगरसेवक भूषण शेलार यांनी वर्षभरात प्रभागांमध्ये लाखो रुपये किमतीचा निधी उपलब्द करत विकास कामांची पूर्तता करून आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची झेलक दाखवून दिली आहे .
आमदार निलेश लंके यांच्यासह पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी ,उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा भालेकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर , राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे ,मा. सरपंच बाळासाहेब नगरे यांच्यासह सभापती योगेश मते,नितीन अडसूळ,सौ.प्रियंका औटी,सौ.विद्या कावरे यांच्या सह नगरसेवक अशोक चेडे ,सौ.निता औटी ,सौ.सुप्रिया शिंदे , हिमानी नगरे,श्रीकांत चौरे यांच्यासह श्री. सुभाष शिंदे ,विजय भास्कर औटी,डॉ.सचिन औटी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये सुरू असलेले विकास कामे सुरू करून पूर्णत्वास नेले ते पाहून प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
पारनेरचे ग्रामदैवत श्री.काळभैरवनाथ मंदिरातील पूजेसाठी मंदिरातील पुजारी मनकर्णिका बारव या ठिकाणावरून पूजेसाठी पाणी घेऊन येतात या मनकर्णिका बारावेपर्यंत जाण्यासाठी जो जुना रस्ता होता . तो रस्ता अनेक वर्षापासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. पहाटे व सायंकाळी देवाच्या पूजेसाठी या बारवे मधून पाणी आणले जाते. या मार्गावर अनेक अतिक्रमण झाल्यामुळे खूप वर्षांपासून हा ” गाडूमार्ग ” बंद अवस्थेत आहे. प्रभागांमध्ये निवडून आलेल्या अनेक उमेदवारांनी या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे फक्त आश्वासन दिले होते.परंतु निवडून आल्यानंतर नगरसेवक भूषण शेलार यांनी चिकाटीने या सर्व बाबतीत पाठपुरावा करून लवकरात लवकर गाडूमार्ग पूर्ण होईल असा शब्द दिला होता.
आमदार निलेशजी लंके साहेब यांनी या मार्गाची पाहणी केल्यानंतर व भूषण शेलार यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत या गाडूमार्गाचे मार्गाचे काम सुरू केले आहे . पारनेरकरांच्या जिव्हाळा व धार्मिक अस्मितेचा विषय असलेला हा गाडूमार्ग लवकरच पूर्ण होईल असे नगरसेवक भूषण शेलार यांच्याकडून सांगण्यात आले आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांचे व घराणे शाहीतील उमेदवार या ठिकाणी निवडून आले . त्यांच्याकडून आतापर्यंत या प्रभागामध्ये कुठलेही विकास कामे झालेली दिसत नाहीत.परंतु एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी या ठिकाणी विजयानंतर सुरू केलेले विकास कामे पाहून आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी योग्य असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .प्रभागातील सुरू असलेले छोटे मोठे विविध विकास कामे या ठिकाणी नगरसेवक भूषण शेलार यांनी स्वतः उभे राहून त्याची उत्कृष्टता व दर्जा तपासून पूर्ण करून घेतली आहे.प्रभागातील सर्वांनी दाखवलेले प्रेम विश्वास आपुलकी यांनाही कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही येत्या काळामध्ये प्रभागाचा चेहरा मोहरा नक्की बदललेला असेल व मॉडेल प्रभाग म्हणून प्रभागाकडे पाहिले जाईल असा विश्वास नगरसेवक भूषण शेलार यांनी व्यक्त केला .