इतर

चिमुकली राजेश्वरी जाधव करणार 3500 कि.मी ची पायी नर्मदा परिक्रमा!

दत्ता ठुबे/पारनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी लाखो भाविक जातात. महाराष्ट्रातून नगर जिल्ह्याची ४ वर्षाची चिमुकली राजेश्वरी जाधव परिक्रमासाठी जातेय. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ही नगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

शिवरात्रीनंतर साडेतीन हजार किलोमीटर ची परिक्रमा करून राजेश्वरी महाराष्ट्रात येणार आहे. साडेतीन हजार किलोमीटर ची परिक्रमा करून परतणारी राजेश्वरी महाराष्ट्रातील ४ वर्षाची पहिलीच कन्या असणार आहे.

मातोश्री नर्मदे हर नर्मदा मैया च्या कृपेने १२ ऑक्टोबर २०२२ तीन महिन्या पासून ओमकारेश्वर या ठिकाणावरून विश्वात आत्तापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या लहान वयात मां नर्मदा पायी परिक्रमा करणारी मैयाच्याच कृपेने चार वर्षाची कन्या रासेश्वरी रमेश जाधव( गाव चेडगाव ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर )येथील राजेश्वरीचे पिताश्री ह. भ. प. रमेश महाराज जाधव मातोश्री ह. भ. प. अर्चनाताई गिरी जाधव यांची कन्या बालपणापासूनच भक्तिमय वातावरणामध्ये आहे. या कन्याची दोन वेळा गाडीने परिक्रमा झालेली आहे. राजेश्वरीच्या आईची २०१४ व २०१६ मध्ये दोन वेळा पायी परिक्रमा झालेली आहे. आईकडील व बाबांकडील दोन्हीही कुटुंब सत्संगात आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि आत्ता ही कन्या तीन महिन्यापासून मां नर्मदा नदी या एकच जलतीर्थाची नर्मदा मैया ची परिक्रमा केल्या जाते ती साडेतीन ते पावणेचार हजार किलोमीटर ची परिक्रमा आहे म्हणजे प्रदक्षिणा तर आत्तापर्यंत अडीच हजार किलोमीटर मां नर्मदा मैया च्या कृपेने चार वर्षाची राजेश्वरी मैया पूर्ण रोज २५ ते ३० किलोमीटर चालत आहे. ही मैया ची कृपा व नर्मदा मैया चे स्वरूप म्हणजे बालस्वरूप मानले जाते. ही सगळी मां नर्मदा मैयाचीच शक्ती आहे म्हणून चार वर्षाची महाराष्ट्रातील रासेश्वरी मैयाच्या दर्शनासाठी स्वागतासाठी दक्षिण व उत्तर तटावर हजारो भाविकांची गर्दी होत आहे. फक्त नर्मदे हर म्हणण्यासाठी सात जन्माचे पुण्य लागतं तर नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ६० हजार वर्षांचे पुण्य लागतं तर आई-वडिलांच्या पुण्याइने राजेश्वरीचे व आजी आजोबा दोन्हीही कुटुंबातील यांच्या पुण्याईने व तिच्या पूर्व जन्माच्या पुण्याईने चार वर्षाचे असताना ही परिक्रमा होत आहे. ही सगळी मैयाचीकृपा आहे ह. भ. प. रमेशानंद महाराज जाधव व ह. भ. प. अर्चनाताई गिरी जाधव या पारनेर तालुक्यातील पाबळ गावात प्रतिवर्षी कीर्तन सेवा करणेकरीता येतात यांची कन्या राजेश्वरी जाधवगिरी नगर जिल्हा, महाराष्ट्राचे भूषण आहे म्हणून तिचे अभिनंदन व शिवरात्रीनंतर रासेश्वरी महाराष्ट्रात साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा करून येणार आहे.

राजेश्वरी बरोबर तिच्या आई-वडील व स्वरमाला शिंदे राधेश्याम परिवारातील रामदास भगवंत गोरडे, शांताबाई रामदास गोरडे, विमल भानुदास गोरडे, सिताराम कानू गायकवाड, जयवंत नाईक काका व महाराष्ट्रातील परिक्रमावासी पण बरोबर आहे. परिक्रमेमध्ये गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राजेश्वरी चे स्वागत केले. आपल्याकडे या परिक्रमावासींचे पारनेर ग्रामीण पतसंस्था परिवाराच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर परिक्रमावाशीयांचे स्वागत व अभिनंदन करत आहोत व दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. पारनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने राजेश्वरी चे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button