डॉ.नीलम हांडे-शिंदे यांना राज्यस्तरीय त्रिरत्न महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर

अकोले,/ प्रतिनिधी
महाराष्ट्र महिला विकास मंच,पुणे या संस्थेच्या वतीने डॉ.नीलम हांडे-शिंदे यांना राज्यस्तरीय त्रिरत्न महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.
वरील संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उतुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा दरवर्षी सन्मान केला जातो.
डॉ.नीलम हांडे-शिंदे यांना वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हा राज्यस्तरीय त्रिरत्न महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गुरुवार दि.१९ जानेवारी २०२३ रोजी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रथितयश वकील किसनराव हांडे व वकील मंगला हांडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या तर डॉ. अजय शिंदे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.या पुरस्काराबद्दल डॉ. नीलम यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.