पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात उसाला भीषण आग!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
: पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारामध्ये ऊसाला भीषण आग लागली आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली
यामध्ये पंधरा ते वीस लाखाची नुकसान झाल्याचा अंदाज आहे राधाकिसन निवृत्ती आव्हाड यांच्या जमिनीमधून वैजनाथ परळी कडून आलेल्या वीज वाहक लाईनगेली असून या लाईन मधून मोठा आवाज होऊन एक ठिणगी पडल्याने या उसाला आग लागली
या आगीमध्ये पाच शेतकऱ्यांचा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे यामध्ये राधाकिसन निवृत्ती आव्हाड(३ एकर) भगवान निवृत्ती आव्हाड( ३ एकर) जनार्दन कारभारी आव्हाड (२ एकर) नवनाथ आव्हाड (३ एकर) अर्जुन रघुनाथ आव्हाड (२ एकर) दिलीप पोपट आव्हाड(२ एकर)
असे पंधरा ते वीस एकर जमिनीमधील ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे
यावेळी शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती की शेतकऱ्यांना त्याआगी पर्यंत पोहोचता आले नाही त्यामुळे एका शेतातील आग ही संपूर्ण पंधरा ते वीस एकर आला लागली तीन ते चार तासानंतर आग विझविण्यास शेतकऱ्यांना यश आले त्यामुळे शेतामधील मेन टावर लाईन याकडे प्रशासनाने लक्ष घालून त्याचा बंदोबस्त करावा व जळालेला उसाला दोन ते तीन दिवसांमध्ये कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश कारखान्यांना तातडीने द्यावी असे आव्हान संपूर्ण शेतकऱ्याकडून करण्यात आली आणि प्रशासनाने ताबडतोब पहाणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे यापूर्वीही या ठिकणी अशी घटना घडली होती असे सांगण्यात आले