उरण नगरपरिषदेचे माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी या विषयावर व्याख्यान

उरण/ रायगड
हेमंत सुरेश देशमुख
रायगडचे जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर (भा.प्र. से) यांच्या संकल्पनेतून मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली। उरण नगरपरिषदेचे माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी या विषयावर व्याख्यान सम्पन्न झाले
डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, अमरावती या संस्थेचे राज्य समनव्यक सौ.सोनाली बुंदे आणि श्री. धीरज रामदास बुंदे यांचे upsc,mpsc आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला निवृत्त सहाय्यक आयुक्त श्री. सुधाकर पाटील (IRS) केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग उपस्थित होते.
सदरहू कार्यक्रम माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयाच्या येथे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिकेमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वार्थाने सहभाग घेतला. बुंदेमॅडम यांना विविध शंका विचारल्या या शंकांचे समर्पक शब्दांत उपस्थित बुंदे मॅडमनी शंकांचे निरसन केले. अतिशय अभ्यासपूर्ण वातावरणात हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषदेच्या मीनाताई ठाकरे वाचनालयाने केल्याबद्दल आयोजकांचे आणि व्याख्यात्यांचे आभार मानले.
