श्री बाळेश्वर विद्यालयाचे रंगभरण स्पर्धेत यश

संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,श्री बाळेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार. या विद्यालयांमध्ये संगमनेर कला अध्यापक संघ आयोजित रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये एकुण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये 7 वी ते 8 वी गटात शालेय स्तरावर प्रथम व तालुका स्तरावर पाचवा क्रमांक निशांत गभाले या विद्यार्थ्यांने यश संपादन केले . तर 5 वी ते 6 वी गटात शालेय स्तरावर प्रथम क्रमांक खुशाल फटांगरे याने मिळविला व 9 वी ते 10 वी या गटात शालेय स्तरावर तनुष्का पोखरकर या विद्यार्थीनीने मिळविला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके ,चित्रकला शिक्षक विश्वास पोखरकर,अशोक जाधव,गंगाधर पोखरकर,भाऊराव धोंगडे,तुकाराम कोरडे,बाळासाहेब डगळे,आप्पासाहेब दरेकर,हेमंत बेनके,चेतन सरोदे,विठ्ठल फटांगरे,संतोष भांगरे,भारत हासे,श्रीकृष्ण वर्पे, सोमनाथ सलालकर,नारायण डोंगरे,मंगेश औटी,मनोहर कचरे,मोहन वैष्णव,औटी यांनी अभिनंदन केले आहे.