माथेरान च्या पूजा पारधी ची पर्यटन सेवेची सुरू आहे धडपड!

माथेरान दि 20 आजच्या धकाधकीच्या जीवनात कष्टदायक कामे करून सुध्दा आपली आवड जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न क्वचितच काही मंडळी करत असतात. आणि विशेष म्हणजे डोंगराळ दुर्गम भागात राहून आपल्यातील कलागुण लोकांसमोर सादर करीत असताना जे काही कटू अनुभव येतात त्यांचा सामना करत यश संपादन करण्यासाठी जी धडपड सुरू ठेवली जाते सातत्य, चिकाटी आणि जिद्दीने आपल्या छोट्याशा गावासह पर्यटन नगरी माथेरानचे नाव युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणाऱ्या माथेरानच्या पायथ्याशी आदिवासी वाडीत राहणाऱ्या पूजा परशुराम पारधी या मुलीने सुरू ठेवला आहे.
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानच्या पायथ्याशी अनेक आदिवासी वाड्या आहेत की त्याठिकाणी आजही जाण्यायेण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत. पोटाची खळगी भरण्यासाठी बाराही महिने लहानशा पायवाटेने मार्गक्रमण करणाऱ्या आदिवासी भागात स्वातंत्र्यानंतरही अद्याप विकासाची गंगा पोहोचलेली नाही. हे दुर्भाग्य म्हणावे लागेल. त्यासाठी ग्रामीण भागाचा प्रामुख्याने विकास व्हायला हवा. आणि आपण ज्या पर्यटनस्थळावर आपली उपजीविका भागवत आहोत त्या गावाचे ऋण फेडण्
