ग्रामीणमहाराष्ट्र
अकोल्यात नारीशक्ती दिन साजरा

अकोले प्रतिनिधी
जनजाती समाजाच्या प्रगती साठी अफाट व प्रचंड कार्य करणारे अनेक जनजाती वीर योद्धे होऊन गेले परंतु समजा पर्यंत त्यांचे कार्य पोहोचले नाही. राणीमा गाइदिनल्यू यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजाती समाजापुढे जनजाती वीरांचे कार्य पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या रजनी टेके यांनी केले.
जनजाती कल्याण आश्रम गुहक वसतिगृह अकोले येथे राणी मा गाईदिनल्यू जयंती निमित्त नारीशक्ती दिवस साजरा करण्यात आला.त्या वेळी रजनी टेके बोलत होत्या.त्या पुढे म्हणल्या कि राणीमा गाईदिनल्यू ह्या जनजाती समाजासाठी वयाच्या तेराव्या वर्षी इंग्रजांच्या विरोधात लढाईच्या मैदानात उतरल्या.इंग्रज म्हणजे कोण तर नागा जनजाती समाजात इसाई मिशनरी धर्मांतरण करणारे ब्रिटिश, इसाई लोक अमिश दाखवून धर्मांतर करत होते. त्या विरोधात नागा समाजात जागृती केली राणी मा गाईदिनल्यू लहान पणापासून अध्यात्माची राजकारणाची व समाज सेवेची आवड होती. राणी मा गाइदिनल्यू ह्या विष्णू भक्त होत्या त्यानी मणिपूर आसाम भागात अनेक डोंगरावर विंष्णू मंदिर उभारले व जनजाती हिंदू समाजात जागृतचे काम केले.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनजाती कल्याण आश्रमाच्या माजी जिल्हा महिला प्रमूख मंदा ताई सोनवणे उपस्थित होत्या.प्रारंभी राणीमा गाइदिनल्यू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संगीता ताई जाधव, वलवे ताई, वैष्णवी भुजबळ, वैष्णवी जाधव, शोभा भुजबळ,संगीता भुजबळ, रतनबाई जाधव, दिपाली जाधव, गौरी राजगुरू, विमल घोलप, रखमा दिघे, लिंबा दिघे, यशोदा दिघे सारिका टेके,कुसुम भुजबळ पप्पूताई चौधरी, यांच्या सह खानापूरच्या इच्छामणी गणेश महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या प्रमाणात कोव्हीड चे नियम पाळून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार जया पाडवी यांनी केले.