
कोतुळ येथे कडकडीत बंद
जमावाने फेरी काढून केला निषेध
कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे देशमुख आणि गोडे या दोन समाजातील कुटुंबामध्ये आज सकाळी रस्त्याच्या वादातून जबर हाणामारी झाली या हाणामारीत देशमुख कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दोन समाजातील या वादातून गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून आरोपींना अटक करण्यासाठी जमावाने निषेध फेरी काढत गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे
अनेक वर्षापासून कोतुळ येथील गोडे आणि देशमुख या कुटुंबाचा जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याचा वाद आहे याबाबत काही दिवसापूर्वी हा रस्ता खुला करण्यासाठी न्यायालयीन निकाल झाला होता या निकालानंतर महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात देशमुख कुटुंबीयांना रस्ता खुला करून दिला होता त्यानंतर अवघ्या एका महिन्यातच पुन्हा हा वाद उफाळून आला प्रशासनाने रस्ता खुला करून दिल्यानंतर या रस्त्यावर गोडे कुटुंबीयांनी घराचे बांधकाम सुरू केले असता या बांधकामाला देशमुख कुटुंबियांनी लेखी हरकत घेतली यानंतर आज हे बांधकाम सुरू असताना या ठिकाणी जोरदार हाणामारी झाली गोडे कुटुंबीयांनी देशमुख कुटुंबांवर विटा तसेच दगडफेक करत खोऱ्याने जबर मारहाण करत सुरेश वामनराव देशमुख देविदास वामनराव देशमुख बाळासाहेब आरोटे अमोल आरोटे यांना गंभीर जखमी केले
तालुक्यातील कोतुळ गावात सुरेश वामनराव देशमुख देविदास वामनराव देशमुख आणि लक्ष्मण नामदेव गोडे या दोन कुटुंबात रस्त्याच्या वादावरून मोठी हाणामारी झाली आहे या घटनेत चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने लोणी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश वामन देशमुख यांचे जावई घरी आले रस्त्यात लावलेल्या चार चाकी गाडीवर दगडफेक करून लक्ष्मण नामदेव गोडे यांचे कुटुंबाने देशमुख यांच्या जावयाच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता
मात्र प्रशासनाने देशमुख यांना रस्ता काढून दिला दोन ते तीन दिवसांपूर्वी सुरेश देशमुख, बाळासाहेब आरोटे यांना प्रशासनाने काढून दिलेल्या रस्त्यात गोडे कुटुंबांनी घरासाठी पाया खोदला होता यावेळी लगतचे शेतकरी तेथील शेतकरी बाळासाहेब आरोटे यांनी गोडे यांचे विरुद्ध काल रात्री तक्रार दाखल केली होती आज दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस पाटील व स्थानिक पोलीस यांनी समक्ष जाऊन गोडे यांना घराचे काम बंद करण्याचे सांगितले असता शाब्दिक चकमकीतून गोडे कुटुंबियांनी देशमुख आरोटे कुटुंबीयांवर विटा आणि दगडफेक सुरू केली व लोखंडी खोरे, कोयता, लाकडी दांडके व दगड विटा याने जबर मारहाण सुरू केली झालेली हाणामारी थांबवण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस पाटील सतीश देशमुख तसेच पोलीस कर्मचारी श्री गोराणे हे देखील या मारहाणीत जखमी झाले
कोतुळ येथे शेत गट नंबर 553 वरील रस्त्यावर कोतुळ तालुका अकोले जिल्हा -अहमदनगर येथे ही घटना सकाळी 11 वाजता घडली
महेंद्र सुरेश देशमुख (वय-33 वर्षे) धंदा -कापड दुकान व शेती राहणार -कोतुळ तालुका अकोले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली असून
अकोले पोलिसांनी अकोले पोलीस स्टेशन-गुरनं कलम-32/2023 भादविक 307,326,324,323,336,143,147,148,149,504,506प्रमाणे
1) नामदेव दगडू गोडे 2)लक्ष्मण नामदेव गोडे 3) भरत नामदेव गोडे 4)विठ्ठल नामदेव गोडे 5)जितेंद्र लक्ष्मण गोडे 6) इंदिरा लक्ष्मण गोडे 7)सरला भरत गोडे 8)वनिता विठ्ठल गोडे सर्व राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा -अहमदनगर आठ आरोपींपर गुन्हा दाखल केला आहे
–1)संजय सातव सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी अतिरिक्त चार्ज संगमनेर विभाग संगमनेर 2) मिथुन घुगे सपोनि तथा पोस्टे प्रभारी अधिकारी अकोले पोलीस स्टेशन 3) भूषण हंडोरे पोलीस उपनिरीक्षक 4) पोसई बाजीराव गवारी नेमणूक अकोले पोलीस स्टेशन यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देत पाहणी केली असून
नमूद गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी अटक केले आहेत
– मिथुन घुगे सपोनि तथा पोस्टे प्रभारी अधिकारी अकोले हे पुढील तपास करत आहे

जुना पैठण रस्ता 33 फूट रुंदीचा आहे तो रस्ता प्रशासनाने खुला करून दिला आहे त्याबाबत कोर्टाचा निकाल बाळासाहेब आरोटे सुरेश देशमुख देवीदास देशमुख यांचे यांच्या बाजूने लागला असतानाही लक्ष्मण नामदेव गोडे यांनी त्याच रस्त्यावर पुन्हा घराचे बांधकाम सुरू केल्याने हा वाद निर्माण झाला त्यातून आरोटे , देशमुख कुटुंबीयांवर हल्ला झाला त्यामुळे गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला प्रशासनाला यापूर्वी मी कल्पना दिली होती यातून काही बरे वाईट होऊ शकते यातून काही दुर्घटना घडू शकते याबाबत मी स्वतः तहसीलदार यांना याची कल्पना दिली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी सांगितले वेळीच दखल घेतली असती तर ही घटना टळली असती
सिताराम पाटील देशमुख
(माजी उपाध्यक्ष जिल्हापरिषद अहमदनगर)