सेनापती बापट पतसंस्थेत १ कोटी ८१ लाख नफा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पारनेर या संस्थेस सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात रुपये १ कोटी ८१ लाखांचा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन रामदास भोसले यांनी दिली.
संस्थेच्या मार्च २०२३ अखेर १६४ कोटी ६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भाग भांडवल २९४ कोटी ३१ लाख रुपये आहे. संस्थेचे अधिकृत भाग भांडवल १० कोटी असून वसूल भाग भांडवल रुपये १ कोटी ६१ लाख आहे तर इतर निधी ८ कोटी १७ लाख रुपये आहे. संस्थेची मालमत्ता रुपये १३ कोटी ३८ लाख आहे. संस्थेचे कर्ज वाटप ९९ कोटी ५८ लाख असून रोख व बॅक शिल्लक १ कोटी ६६ लाख आहे. संस्थेची गुंतवणूक ३७ कोटी २२ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये ७५० कोटींची झालेली आहे. संस्थेच्या सन २०२२-२३ मध्ये २० कोटी रुपयांनी ठेवींची वाढ झालेली असून कर्जामध्ये रुपये ९ कोटी १५ लाख रुपयांनी वाढ आहे असे संस्थेचे व्हा. चेअरमन अण्णासाहेब औटी यांनी सांगितले. संस्थेचे मल्टीस्टेट मध्ये रूपांतर झाले पासून १३ वर्षाच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केली आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती सक्षम असुन संस्था प्रगतीपथावर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब झंजाड यांनी सांगितले. संस्थेच्या प्रगतीकडे वाटचाल करताना संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार, सर्व ग्राहक व हितचिंतक सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सर्व अधिकारी शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद यांनी संस्थेचे आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी व थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संस्थेचे संचालक ॶॅड पी. एस. कोल्हे यांनी कौतुक करून सर्वांचे आभार मानले.