
विनय समुद्र
कोतुळ प्रतिनिधि
कोतूळ ता.अकोले येथील श्री वरदविनायक गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली .चौदा विद्या व चौसष्ट कालांचा अधिपती असलेला गणपती याची जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ला गणेश जयंती म्हणून ओळखले जाते.हा उसत्व माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो.
नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती असल्यामुळे माघी जयंतीचे निमित्त साधून शुक्रवारी भाविकांनी मंदिरात पहाटे पाच वाजल्या पासून कोव्हीड चे सर्व नियम पाळून दर्शनाला गर्दी केली होती.पालखी सोहळ्या नंतर गर्दीत वाढ होत गेली त्या मुळे संध्याकाळच्या वेळी कोतूळ राजूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती.
पहाटे पाच वाजता भूपाळी वादना नंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. सकाळी श्री.व सौ.विजय तोराकडे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व महापूजा करण्यात आली.त्यानंतर दिवस भर वेदमूर्ती भाऊ जाखडी यांच्या नेतृत्वाखाली होम हवन व गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते.यात सौ.उजवला व सुनीलदेशमुख.सौ.अनुराधा व आशुतोष घाटकर,आरती व विजय तोरकडे,अर्चना व चंद्रकांत गीते, सौ.निकिता व गणेश बोऱ्हाडे हे भाविक सपत्नीक सह भागी झाले होते. या वेळी मनोकामना पूर्ण झाल्या बद्दल गणेश भक्ता कडून आर्धा किलो चांदीची छत्री श्री वरदविनायकाला अर्पण केली.तर अनेक भाविकांनी नारळ तोरणे अर्पण केली.
संध्याकाळी पालखी सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणा झाल्या नंतर सौ.लतिका व वकील सदानंद पोखरकर यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली.देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला. वेळी कोव्हीड प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावरील महाप्रसादाची पंगतीचे आयोजन न करता मंदिरातच भाविकांना रांगेत प्रसाद वाटप करण्यात आले. त्यातर प्रसाद म्हणून अकरा हजार मोदकांचे व लापशी रव्याचे वाटप भाविकांना करण्यात आले.रात्री परिसरातील भजनी मंडळाच्या यां वतीने हरी जागर करण्यात आला.मंदिर परिसरात भव्य मंडप टाकून आकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था,देणगी कक्ष,महाप्रसाद आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप भाटे,संभाजी पोखरकर,वासुदेव साळुंके,,तुकाराम आरोटे, दिपक परशुरामी,विशाल बोऱ्हाडे,निवृत्ती पोखरकर, दीपक राउत,विनय समुद्र, कुलदीप नेवासकर,अनिल पाठक,सचिनपाटील,प्रशांत परशुरामी,बाळासाहेब देशमुख,भाऊसाहेब देशमुख, संतोष नेवासकर, महेश परदेशी,योगेश समुद्र,सचिन वाकचौरे,देवानंद पोखरकर,सर्जेराव देशमुख,रेवनदेशमुख,प्रकाश पोखरकर, व जय भवानी संकृती संवर्धन मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.
