महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात नृत्यस्पर्धा उत्साहात

पुणे-महिलाश्रम वसतिगृहाच्या ‘ भरारी’ या वसतिगृह दिनानिमित्त तसेच संक्रातीनिमित्त २१ जानेवारी २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नृत्यस्पर्धा, हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ , व्याख्यानाला मुलींचा मोठा प्रतिसाद लाभला.
‘महाराष्ट्राची संस्कृती’ अशी नृत्य स्पर्धेची थीम होती.
सुरुवातीला गणेश वंदनेने वातावरण भरून टाकले. त्यानंतर मी मराठी, लोककला, महाराष्ट्राची लोकधारा, गोंधळ, कोळीनृत्य, जोगवा, देशभक्तीपर नृत्य असे विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले. अनबि्टेबल डान्स अकॅडमीचे संचालक सतीश पवार यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. केसवर्कर सौ. कुमुद पाठक यांनी ओळख करुन दिली.

संक्रातीनिमित्त संस्कार भारतीच्या गीता कोलंगडे यांचे भारतीय संस्कृती सण आणि उत्सव या विषयावर व्याख्यान झाले. चैत्र महिन्यापासून सुरु होणारे सण आणि त्यामागील विज्ञान समजावून सांगितले. वसतिगृह प्रमुख सुमन यादव /तांबे उपप्रमुख पूनम पोटफोडे तसेच सर्व सेवकवर्ग यावेळी उपस्थित होता .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्ञानेश्वरी बटवाल व कु. सानिका कुदळे या विद्यार्थिनींनी केले. केसवर्कर सौ. कांचन फाळके यांनी आभार मानले.

व्याख्यानानंतर सर्व मुलींना तिळगूळ वाटप करण्यात आले.