महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली अकोल्यातील मंडलिक परिवाराची सांत्वनपर भेट

अकोले /प्रतिनिधी
महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज उंचखडक बुद्रुक (ता अकोले )तालुक्यातील जेष्ठ पत्रकार श्री.भाऊसाहेब मंडलिक यांच्या पत्नी कै.रत्नप्रभा मंडलिकताई यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेट दिली.
याप्रसंगी श्री सद्गुरु यशवंतबाबा चैरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक श्री.अशोकराव देशमुख यांनी श्री क्षेत्र राममाळ येथे थोरात साहेबांच्या माध्यमातुन झालेल्या कामांना उजाळा दिला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अशोकराव देशमुख,प्रतापराव देशमुख, भाऊसाहेब खरात, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय श्री.मधुभाऊ नवले, अकोले काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे,सोन्याबापु वाकचौरे,बाळासाहेब नाईकवाडी,मिनानाथ पांडे,रमेशआण्णा जगताप,शंकरराव वाळुंज,शिवाजीराजे नेहे, विक्रमभाऊ नवले,प्रदिपराज नाईकवाडी,अनिलजी वैद्य,उंचखडक ग्रामपंचायतचे उपसरपंच महिपाल देशमुख यांच्या सह उंचखडक ग्रामस्थ उपस्थित होते
