हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून हर्षदाताई काकडे यांनी साधला महिलांशी संवाद

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भारतीय सणातील परंपरा व संस्कृतीचा दर्शन घडवणारा…. मन प्रसन्न करणारे सुमधुर संगीत…..हळदी कुंकूवाचे महत्त्व विशद करणारे सेल्फी पॉईंट…या जोडीलाच आरोग्याची काळजी म्हणून मोफत आरोग्य तपासणी….. या कार्यक्रमाची वर्षानुवर्षाची परंपरा जपत….
सर्वांशीच आदराने बोलणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे…. मनाला संस्कृतीची व परंपरेची जाण करून देणारा कार्यक्रम….आठवणीचा धांडोळा घेणारा व नयनात साठवावा असा महिलांचा मेळा…. बाल गोपाळांची ही गर्दी….या सर्वांच्याच जोडीला स्नेहभोजन…..
शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या विकासात्मक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने एकनिष्ठ व सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या व राजकीय व सामाजिक वसा घेतलेल्या जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी महिला जनशक्ती विकास आघाडी व महिला शक्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी -कुंकु व महिलांची आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन हजारो महिलांशी संवाद साधला.या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भातकुडगाव जिल्हा परिषद गटातील मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी भातकुडगाव गावामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटातील अनेक गावातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमात भाग घेतला. व स्वतःच्या आरोग्य तपासणी करून हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी मोफत करून घेतली.उपस्थित झालेल्या सगळ्याच महिलांचे शेवगाव तालुका महिला जनशक्ती विकास आघाडीच्या समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.