
नेवासा–प्रतिनिधी- गली येथील सरसेनापती वीर सिदनाक शौर्य परिषदेचा या वर्षीचा श्रावणबाळ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला.या निमित्ताने नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला तेव्हा निंबाळकर म्हणाले, समाजात निस्वार्थी पणे समाजासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे, हा सत्कार माझा नसून माझ्या कार्याचा असल्याचे मत व्यक्त केले. त्या बद्दल माळी चिंचोरे, निमगाव वाघा ,उस्थळ दुमाला,परिसरात भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य नामदेव गुरुजी यांच्या निवासस्थानी जेष्ट नेते खंडागळे गुरुजी यांचे हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
भाजपचे नेते खंडागळे गुरुजी म्हणाले,
गोरगरिबांच्या प्रश्नावर अनेक उपोषण करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न. झोपडपट्टी धारकाना मालकी हक्काचे उतारे, दारिद्र्य रेषेच्या यादीपासून वंचित असलेल्या कुटुंबाचा दारिद्र्य रेषेच्या यादीत समावेश , जेष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता ,घरस्फोटित महिला यांचे विविध प्रश्न, अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गोरगरिबांना रेशनिंग , प्रशासकीय त्रुटी मुळे शासकीय योजनेपासून वंचित असलेल्याना लाभ मिळावा , या सारख्या विविध विषयांवर आजपर्यंत उच्च न्यायालयात सुमारे १५ हुन अधिक याचिका दाखल करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न निंबाळकर यांनी केला आहे. याच कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार केल्याचे सांगितले.
या प्रसंगी चांदगाव सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन डॉ. रवी खंडागळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मतकर, पो.पा.विठ्ठल शेंडे, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हसन भाई सय्यद, किशोर विखे, किशोर भुसारी,लक्ष्मण दाणे, बाळासाहेब खांदे,आदी उपस्थित होते.