७५ वर्षांचे जेष्ठ नागरिक रमले ‘बालपणा’च्या आठवणीत.!

पद्मकमळ प्रतिष्ठान व
पद्मशाली सखी संघम
तर्फे आगळावेगळा उपक्रम
सोलापूर : आमच्यासाठी जुन्या आठवणींचा ‘भेट’च (उपहार) प्राप्त करुन दिले आहे. ‘मेरा नाम जोकर’ या हिंदी चित्रपटातील ‘जाने कहाँ गया वो दिन’ या गाण्याचीच आठवण येत असून, पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संघमने आगळावेगळा उपक्रम राबवून आमच्या सारख्या ज्येष्ठांना पुन्हा एकदा लहानपणाच्या जमान्यात घेऊन गेल्याने आयुष्यातील खरा आनंद काय असतो? ते शब्दात मांडणे शक्यच नाही. आजच्या घडीला आमच्या लग्नाला ३५ – ४० वर्षे झाले असतील. मुले, सूना, जावई व नातू आहेत. हे सर्वच विसरुन, आज ह्या वयात पुन्हा मज्जा व धुमाकूळ घालण्याची संधी मिळाली आहे. अशी भावना अनेकांनी ‘पद्मशाली सखी संघम’कडे व्यक्त करत होते.
बालदिनाचे औचित्य साधून सोलापूरातील पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने ज्येष्ठ महिला आणि नागरीकांसाठी ‘जाउयात… बालपणा’च्या जगात’… अशी अनोखा व आगळावेगळा उपक्रम राबवल्याने, ज्येष्ठांमध्ये नव चैतन्य व उर्जा प्राप्त झाल्याने लहान मुलांसारखे आनंदात बुडाले होते. पूर्वी ‘लहान मुले खेळताना आम्ही मोठी माणसे कौतुक करायचो. पण, आज आम्ही खेळताना लहान मुले आमचे कौतुक करुन टाळ्या वाजवत होते’. तेव्हाच भानावर आलो होतो, त्याप्रसंगी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
फाउंडेशन व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आले. पद्मकमळ’चे गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी बालवयात खेळलेल्या गंमती – जंमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे उद्देश विषद केले. दयानंद कोंडाबत्तीनी, प्रा. कृष्णात देवकर, छत्रपती केने, स्नेहल शिंदे यांच्यासह आदींनी लहानपणाच्या किस्से सांगितले. यावेळी क्रिकेट, विटी दांडू, गोट्या, पतंग, गष्टा-पाणी, गजगे, दोरी, फुगडी फुगे, लिंबू चमचा, बुध्दिबळ, संगीत खुर्ची अशाप्रकारे निवडक खेळांचे साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीने सोय करुन देण्यात आले. उत्कृष्टरित्या खेळलेल्या पुरुष व महिला गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक बक्षीसे देण्यात आले. लहान मुलेही सहभाग घेतला. श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, कविता मंगलपल्ली, वैशाली व्यंकटगिरी, पद्मावती संगा, रेणुका चिंता यांच्यासह सखी संघमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम, समन्वयिका कला चन्नापट्टण, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, हेमा मैलारी, विद्या श्रीगादी आदींचे उपस्थिती लक्षणीय होते. खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांनाही पारितोषिके देण्यात आले आहे. रमेश कंदीकटला यांनी आभार मानले.
————————–