-राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उरण तहसील कार्यालया मार्फत जनजागृती

उरण /रायगड
हेमंत देशमुख
–राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि. २५ जानेवारी रोजी उरण तहसील कार्यालया तर्फे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले या प्रभात फेरीमध्ये शाळा महाविद्यालयातील उत्स्फूर्त सहभाग घेतला राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने घोषणा देऊन शहरामध्ये जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. संतोष पवार, उरण नगरपरिषदचे माॅंसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयाचे ग्रंथपाल तथा उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उरण महाविद्यालयाचे प्रा. श्री दत्ता हिंगमिरे आणि प्रा. डाॅ. श्री. एम. जी. लोंढे तसेच सिटीझन हायस्कूल चे शिक्षक अब्दुल मजीद इस्माईल खलीफे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे ही मतदार नोंदणी तसेच आधार कार्ड बरोबर लींक करणे मयत मतदारांची नावे कमी करणे ही कामे उत्तम प्रकारे करणारे निवडक दहा अधिकारी कर्मचारी यांनाही प्रमाणपत्र देऊन मा. उपजिल्हाधिकारी श्री जनार्दन कासार तसेच मा. तहसीलदार श्री भाऊसाहेब अंधारे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती आशा म्हात्रे आणि नायब तहसीलदार श्री पेडवी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

*कोकण ज्ञानपीठ संस्थेचे उरण महाविद्यालय, सिटीझन हायस्कूल, तु हे वाजेकर विद्यालय , एन आय हायस्कूल आणि वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय फुंडे यामधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला
