श्री क्षेत्र कळसेश्वर देवस्थान राजकीय आखाडा बनत आहे ग्रामसभेत चिंता !

परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी
अकोले प्रतिनिधी
परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या श्री क्षेत्र कळसेश्वर देवस्थान हे बाबांच देवासन झाल्यापासून राजकीय आखाडा बनत चालण्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
देवस्थान संदर्भातील हा विषय आज कळस (ता अकोले ) येथील ग्रामसभेत चर्चेत आला ग्रामस्थांच्या या चिंतेनंतर आज ग्रामस्थांनी ग्रामसभेत यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कळसेश्वर देवस्थान येथे कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम न घेण्याचा। ठराव मांडला या धार्मिक ठिकाणी राजकीय कार्यक्रम बंद करण्याचे ठराव ग्रामसभेत घेण्यात आला
श्री क्षेत्र कळसेश्वर देवस्थानचे परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांचे देहवासान झाल्यापासून हे देवस्थान राजकारण्यांचे आश्रयस्थान बनत आहे यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली हे ग्राम ग्रामदैवत राजकारण मुक्त ठेवावे अशी इच्छा अनेकांनी प्रगट केली
या देवस्थानची संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात वेगळी अशी ओळख आहे.
बाबाचे देहावसान झाल्यापासून देवस्थांच्या ठिकाणी काही राजकीय कार्यक्रम सर्रास घेतले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यावर ट्रस्ट म्हणून कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. धार्मिक कार्यक्रम घेतले तर वावघे ठरणार नाही पण त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम करून त्या देवस्थानाला राजकीय आखाडा बनवण्याचा घाट काही राजकीय लोक घालू पहात आहे. असा मुद्दा ग्रामसभेत सागर संपत वाकचौरे यांनी मांडला त्यावर पुरुषोत्तम दत्तात्रय
सरमाडे, आकाश गोसावी, रावसाहेब लक्ष्मण गोरे यांनी या ला अनुमोदन देत हा प्रश्न लावून धरला.
यावर कळस बुद्रुक ग्रांमपंचायत सरपंच राजेंद्र गवांदे यांनी तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या संदर्भात ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून राजकीय कार्यक्रम करू नये अशी विनंती केली जाईल असे आश्वासन दिले.
ब्रम्हलिन महंत १०८ प.पु. सुभाषपुरी महाराज यांचा
पुण्यतिथी कार्यक्रम शनिवार दि. २८ जानेवारी २०२३ ( रथसप्तमी) रोजी कळसेश्वर देवस्थान कळस बु || ता. अकोले। येथे आयोजित केला आहे
सकाळी ७.३० ते ९.३० – ग्रामप्रदक्षिणा सकाळी ९.३० ते ११.३० किर्तन केसरी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव) यांचे हरिकिर्तन होईल व त्यानंतर
सकाळी ११.३० वा: महाप्रसादाचे नियोजन कर न्यात आले आहे
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
समस्त ग्रामस्थ कळस बु॥ प.पु सुभाषपुरी महाराज भक्त परीवार,प.पु सुभाषपुरी महाराज कळसेश्वर देवालय विश्वस्त मंडळ, कळस बु।। यांनी केले आहे

“””””””””””