शरद पवारांनी सह कुटुंब पाहिला आमदार निलेश लंकेचा कोव्हिडं योद्धा माहितीपट !

सोलापुरचे दिग्दर्शक सुशील टकलेंची निर्मिती !
चित्रपट जगताने दिली आ.लंकेच्या कार्याला झळाळी !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून जवळपास ३० हजार ६२४ कोरोना बांधित रूग्ण खडखडीत बरे केले आहे.त्यामुळे आमदार निलेश लंके यांचे कोरोना काळात आदर्श काम माहिती पटाच्या माध्यमातून सोलापूरचे युवा अनुभवी दिग्दर्शक सुशील व दिग्दर्शिकाअर्चना चाटे यांनी माहिती पटाच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचे काम केले
.त्यामुळे या माहिती पटाचा श्रीगणेशा बुधवार दि १ जुन रोजी राष्ट्रवादी काॅग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत पाहणी करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे उभे राहिलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात जवळ जवळ ३० हजारच्या वर रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी गेले आहे.त्यामुळे आ.लंके यांच्या या आरोग्य मंदिराची चर्चा देशा विदेशातही पोहचली आहे. त्यामुळे कोरोना काळातील आमदार निलेश लंके यांच्या संघर्षमय व कौतुकास्पद कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी लवकरच माहितीपट प्रदर्शित केला आहे.
काही दिवसापूर्वी”वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन”ने पुरस्कार देऊन आमदार निलेश लंकेचा सन्मान केला आहे.वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती फराह अहमद यांनी आ. निलेश लंके यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यामुळे आमदार लंके यांच्या कार्याची दखलही चित्रपट जगताने घेतली आहे.तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसह इतर नातेवाईकांच्या मनातील भिंती आमदार निलेश लंके यांनी घालविली असुन या आरोग्य मंदिरात उपचारा बरोबर मानसिक आधार देण्याचे काम सुद्धा केले आहे.
सोलापूरचे युवा अनुभवी दिग्दर्शक सुशील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटरवर माहितीपट तयार केला आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत जाहिरातीचे दिग्दर्शक म्हणून काम करणारे सुशील यांनी अनुभवाच्या जोरावर एका आगळ्या वेगळ्या विषयाला हात घातला आहे. माणुसकीचा आशय असणारा हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.लॉकडाऊन काळात आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या कोरोना सेंटरचे काम त्यांनी बारकाईने पाहिले. त्यांच्या सोबतीला अर्चना चाटे या युवा दिग्दर्शिका मैत्रिणीने संपूर्ण माहिती गोळा केली. त्यावर चर्चा झाली आणि ही सर्व मंडळी अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी शरदचंद्र पवार कोरोना उपचार मंदिर हा फलक वाचून त्यांना आश्चर्य वाटले कोरोना सेंटर मंदिर नाव कसे? मात्र आत गेल्यानंतर त्यांना तिथे काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांच्या कामाची जवळून माहिती घेता आली अन् या कामाची महती पटली. या सर्व गोष्टी माहितीपटात त्यांनी टिपल्या.
या कामाकरिता त्यांना अर्चना चाटे अमोल चोपडे, चित्तरंजन धळ, माया रोकडे, राजेश्वरी कोठावळे यांनी परिश्रम घेतले आहेत.