इतर

अकोले बस स्थानकात प्रवासी दिन साजरा

अकोले /प्रतिनिधी

अकोले बस आगार येथे रथसप्तमी व प्रवासी दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले यांनी एसटी बसचे चालक, वाहक व प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव राम रुद्रे यांनी “रथसप्तमीला” सूर्यनारायण उत्तरायणात प्रवेश करून आपला तेजप्रकाश वाढवतो व आपला पुढील प्रवास चालू ठेवतो. ग्राहक चळवळीचे जनक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी (नाना) यांनी सूर्य हा प्रवासी अधिष्ठाता मानला, म्हणून या मांडलेल्या संकल्पनेनुसार “रथसप्तमी” हा “राष्ट्रीय” प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक पंचायतीने ग्राहकांना नेहमीच केंद्रबिंदू मानून प्रवासी हा सुद्धा रेल्वे व एसटीचा प्रमुख ग्राहक असतो त्याला प्रवास सवलत व हक्क मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून ग्राहक तीर्थ स्व. बिंदू माधव जोशी तसेच रंजीत श्रीगोड यांनी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले होते व आजही संघटना प्रयत्न सतत करत आहे..

ग्राहक पंचायतचे कैलास तळेकर, कवी ज्ञानेश्वर पुंडे,किरण चौधरी, सुदाम मंडलिक, दत्ता ताजणे, नरेंद्र देशमुख, वाहतूक नियंत्रक अशोक पन्हाळे, चालक जयसिंग बोऱ्हाडे, वाहक मधे, नंदू मोहिते, तुकाराम गवारी, शांताराम बोऱ्हाडे, आदी प्रवासी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत राम रुद्रे व आभार वाहतूक नियंत्रक एन. बी गवारी यांनी मानले…

    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button