इतर

अॅड. मनोहरराव देशमुख महाविदयालयात माजी विदयार्थी मेळावा संपन्न.



अकोले /प्रतिनिधी-
आयुष्यात अश्यक्य असे काहीच नाही.ठाम राहायला शिका,स्वत:वर विश्वास ठेवा. वाईटपणातल चांगले शोधा हि खास माणसांची ओळख असते.या देहाला देवाकडे जाताना मधी समाज लागतो. त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.हि उदात्त भावना मनात ठेवा.कारण आनंद वाटणाऱ्या ओंजळींना पुनः भरण्याचे दान देवाकडून लाभलेले असते.असा आशावाद सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांनी व्यक्त केला.
अकोले तालुक्यातील राजूर येथील अॅड.मनोहरराव नानासाहेब देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविदयालयात माजी विदयार्थी मेळावा संपन्न झाला.यावेळी अॅड.देशमुख विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे,संचालक मिलिंद उमराणी,मारूती मुठे,एस.टि.एलमामे, मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी चिमणराव देशमुख,शशिकांत ओहरा,गोकुळ कानकाटे,संतोष बनसोडे,हर्षद मुतडक, प्राचार्य बी.वाय.देशमुख, बी.एस.देशमुख,लहानु पर्बत,मनोहरराव लेंडे, संतोष मुतडक यांसह गणेश मैड,महेंद्र वराडे,सुरेश भालेराव, राहुल भांगरे, नितिन तळपाडे, डॉ. दिपमाला तांबे, केशव भांगरे, हर्षद पाबळकर, डॉ.पंक दुर्गुडे, अरूण सुकटे. ,अॅड. दत्तात्रय निगळे यांसह बहुसंख्य माजी विदयार्थी उपस्थित होते.
अॅड.मनोहरराव देशमुख यांनी पुढे बोलताना लहानसे रोपटे होते त्याचा वृक्ष झाला. त्याचे रूपांतर वटवृक्षात करायचे आहे.इतर कोर्सेस सुरू करायचे आहेत.मनातील न्युनगंड बाजूला करा.गोरगरीबांना मदत करा. चांगले काम करून ऋण फेडता येते. यश हे एका दिवसात मिळत नाही. हा वृक्ष उभारणीत श्री. कानवडे सरांचे योगदान महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सचिव टि.एन.कानवडे यांनी यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका,तसेच कष्टाला घाबरू नका.कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पाडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत रहातात त्यांनाच यश प्राप्त होते. मोठे व्हा. यशस्वी व्हा. मोठे होताना ज्यामुळे मोठे झालो त्याकडे मागे वळून पहा. असे विचार प्रतिपादीत केले.
माजी विदयार्थांच्या वतीने सिनेट सदस्य प्रा.नितिन तळपाडे,वैज्ञानिक राहुल भांगरे, डॉ रंजना कदम,कमल देशमुख,अरूण सुकटे, प्रा. अजय पवार, उपसरपंच संतोष बनसोडे, संतोष मुतडक, गणेश मैड आदींनी महाविदयालयाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित माजी विदयार्थ्यांचा शाल व टॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.वाय. देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.रोहित मुठे व प्रा.डॉ.वाल्मिक गिते यांनी केले.तर गणेश मैड यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटे स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button