खडकी व शिसवद येथील बंधा-याचे ढापे चोरणारी टोळी गजाआड! राजूर पोलिसांची कारवाई

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खडकी व शिसवद येथील बंधाऱ्यांची चे लोखंडी ढापे चोरणारी टोळी राजूर पोलिसांनी गजाआड केली
, दिनांक 12/09/2022 रोजी रात्रीच्या दरम्यान खडकी येथील बंधा-यावरुन 80 लोखंडी ढापे चोरीला गेले होते. त्याबाबत श्री. रामभाऊ इंदु पोरे यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे ढापे चोरी बाबत तक्रार दिली होती त्यावरुन राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं 200/2022 भा. द. वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता..
आज रोजी कार्यलयात हजर असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना गोपनिय बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, सहा महिण्यापुर्वी खडकी व शिसवद येथील बंधा-यावरील ढापे हे नामे राजाराम तातळे, यांने चोरले बाबत माहीती मिळाली सदर माहीती तसेच तांत्रीक विशलेषन करुन सदर चा गुन्हा हा राजाराम नारायण तातळे यांनी केल्या बाबत खात्री झाल्याने राजाराम नारायण तातळे, वय 39 वर्ष, रा. तातळेवाडी, बिरगावतराळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यास चौकशी कामी ताब्यात घेवून त्यास सदर घटने बाबत सखोल चौकशी केली असता सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्यांने त्यांच्या साथीदारच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले त्याचे साथीदार नामे शंकर सावकार आढळ, वय 35 वर्ष, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक, व ज्ञानेश्वर अनाजी बगाड, वय 22 वर्ष, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहोत.
सदर आरोपी यांच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन महिंद्रा बोलेरो कंपनी च्या पिकअप तसेच एक ऑक्सीजन गॅस ची टाकी, एच पी कंपनीची घरगुती वापराची गॅसची टाकी, गॅस कटर, लोखंडी कटर असा एकुन 12,14000 /- रुपये मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री संजय सातव, उपविभागिय पोलीस अधिकारी, शिर्डी, चार्ज संगमनेर विभाग संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जी.एफ शेख, पोहेकॉ विजय मुंढे, पो हे कॉ / कैलास नेहे, पो ना / दिलीप डगळे, पो ना / पटेकर, पो कॉ / संभाजी सांगळे, पो कॉ / अशोक गाढे, पो कॉ/ विजय फटांगरे, पो कॉ /सुनिल ढाकणे, पो कॉ / साईनाथ वर्पे, पोकों/ अशोक काळे, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील नेमणुकीचे पो ना / फुरकान शेख यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ / विजय मुंढे हे करत आहेत.