नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात 49.28 टक्के मतदान

विजयाची माळ कुणाच्या गळ्यात उत्सुकता शिगेला
50 टक्के मतदारांनी मतदाना कडे फिरवली पाठ!
अहमदनगर दि 30 – विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात आज सोमवारी (दि.30 ) मतदान प्रक्रिया पार पडली यात सम्पूर्ण मतदार संघात एकूण 49.28 टक्के मतदान झाले
नाशिक पदवीधर मतदारसंघात नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,नाशिक आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात एक लाख 80 हजार 198 पुरुष मतदार तर ८२,४७८ स्त्री मतदार असे एकूण दोन लाख 62 हजार 678 मतदार आहेत यापैकी या निवडणुकीत 95 हजार 984 पुरुष मतदार आणि 33472 स्त्री मतदार अशा एकूण एक लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले
मतदान आकडेवारी वरून पदवीधर मतदारांमधील निरुत्साह दिसून आला 50 टक्के पेक्षा अधिक पदवीधर मतदारांनी या मतदाना कडे पाठ फिरवली उमेदवारांचे प्रचारक आणि समर्थक मतदारांपर्यंत न पोहचल्याने मतदारांची आकडेवारी घसरली
जिल्हा निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
नंदुरबार जिल्ह्यात अठरा हजार नऊशे अठरा मतदारांपैकी 9 385 मतदारांनी मतदान केले ही ( 49.61 टक्के )
धुळे जिल्ह्यात 23 412 मतदारांपैकी 11822 मतदारांनी मतदान केले ( 50. 50टक्के )जळगाव जिल्ह्यात पस्तीस हजार झिरो 58 मतदारांपैकी 18000 ते 30 33 मतदारांनी मतदान केले हे टक्केवारी 51.44 झाली नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652 मतदारांपैकी एकतीस हजार 933 मतदारांनी मतदान केले (45.85 टक्के )
अहमदनगर जिल्ह्यात एक लाख 15 हजार 638 मतदारांपैकी 58 हजार 283 मतदारांनी मतदान केले (50.40 टक्के) नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते परंतु यात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात चुरशीची लढाई झाली मतदान टक्केवारी घसरल्याने याचा फायदा कोणाला होतो याकडे लक्ष लागून आहे
विस्ताराने मोठा असणारा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ संघात धुळे ,नंदुरबार ,जळगाव ,नाशिक आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात नोंदविले गेले आहे अहमदनगर जिल्ह्यात एक लाख 15 हजार 638 मतदारांपैकी 58 हजार 283 मतदारांनी मतदान केले आहे यामुळे जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा निर्णय ठरणारा आहे अहमदनगर जिल्ह्यात 50.40% मतदान झाले सर्वाधिक कमी 49.61 टक्के मतदान नंदुरबार जिल्ह्यात झाले तर 51.44% मतदान जळगाव जिल्ह्यात झाले 338 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून 2 फेब्रुवारी 20 23 रोजी नाशिक येथे मतमोजणी होणार आहे मतांची कमी टक्केवारी शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यातील चुरशीच्या लढाईत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे