पोखरीकरांचे उपोषण विखे, झावरे यांच्या मध्यस्थीने सुटले!.

.
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पोखरी येथील ग्रामदैवत श्री.रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्ट व समस्त पोखरी ग्रामस्थांच्या उपोषणास पाठिंबा देताना सुजित झावरे पाटील यांनी यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा ग्रामस्थांसमवेत दूरध्वनीवर संपर्क साधून दिला. श्री.रंगदास स्वामी मंदिरामध्ये अनधिकृतपणे चाललेल्या उपोषण कर्त्यांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे तसेच त्यांच्यावर फौजदारी करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण माघे घेण्यात आले. तहसिलदार अावळकंठे, पारनेर पोलीस स्टेशनचे पी आय घनश्याम बलप, बांधकाम समिति सभापति काशिनाथ दाते, राहूल पाटील शिंदे, विजय औटी, बाजार समितीचे माजी सभापती अरूणराव ठाणगे, किसनराव धुमाळ, निजाम पटेल, परसराम शेलार,संतोष शेलार, सतिष पिंपरकर, संदीप घोडके, सतिष पवार, पंडीत पवार, सोपान फडतरे, राजेंद्र वाकळे, बाबाजी वाकळे, म्हाताजी पवार, बबन हाडवळे, संजय करंजेकरसह ग्रामस्थ तसेच तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
