अकोले, संगमनेर कडे जाणाऱ्या बस पूर्ववत करा – विवेक आंबरे

गणोरे प्रतिनिधी :-
गणोरे (ता.अकोले) या ठिकाणांहून अकोले आणि संगमनेर या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या बस तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी गणोरे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री विवेक मच्छिंद्र आंबरे यांनी केली आहे.
गावातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक दृष्टीने अत्यंत गरजेचीआणि महत्वाची समस्या निर्माण झाली आहे. दररोज अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अकोले आणि संगमनेर येथे जात असतात.संपूर्ण महाराष्ट्रात बस सेवा पूर्वरत सुरू झाल्या असून अजूनही गणोरे या मोठ्या तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी या गावाहून अकोले आणि संगमनेर येथे जातअसतात.सध्या त्यांची आणि विशेषत विद्यार्थिनींची प्रचंड अडचण होत आहे.पालकांनाही कमी वयात इच्छा नसताना फक्त बस बंद आहेत या एकमेव कारणामुळे गाडी विधायर्थ्यांच्या हातात द्यावी लागताहेत.सध्या पेट्रोलचे वाढते दर ,प्रचंड उन्हाचा तडाखा, आणि बेशिस्त वाहतूक या सर्वांचा परिणाम हा विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही होत असून अकोले आणि संगमनेर या दोनही आगारातून तातडीने गणोरे साठी असणाऱ्या पूर्वी पासून च्या बसेस सुरू कराव्यात अन्यथा गणोरे येथे आंदोलन करावे लागेल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही दोन्ही आगार प्रमुख यांची राहील. तातडीने या मागणीची दोनही आगार प्रमुख यांनी दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष शुभम आंबरे, ग्रामपंचायत सदस्य श्री विवेक मच्छिंद्र आंबरे, पोपट आहेर, सोमनाथ आहेर,अशोक दातीर, भाउपाटील आंबरे, राजेंद्र वालझाडे, गणेश आहेर, तुषार आंबरे, अनिल आहेर, गणेश सोनवणे,ऋतिक बिडवे,गिरीश बिडवे,मयूर आंबरे,अनिकेत खतोडे,लखन आहेर,अनिकेत गायकवाड,श्रवण चौधरी,किरण खतोडे,वैभव सोनावणे, अनिकेत शिंदे, वैभव आहेर,मंगेश वाकचौरे, प्रज्वल लेहेकर,अक्षय आहेर,अन्वर शेख, गौरव जाधव,तेजस शिंदे,आकाश आहेर,विजय आहेर, रामेश्वर पवार, निखिल वाकचौरे,सुमित उगले, चैतन्य काळे,अभिषेक काळे, रोशनी चव्हाण, शितल आहेर,कोमल आहेर,आदिती कोळपकर,कोमल भालेराव,साक्षी आंबरे,आदी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक, आणि जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ गणोरे, पिंपळगाव निपाणी,वीरगाव,देवठाण,सावरगाव पाट,समशेरपुर आदी आढळा विभागातील सर्व नागरिक यांनी मागणी केली आहे.
बस सेवा पूर्वरत झाल्या असून गणोरे सारख्या मोठ्या गावातून अजूनही दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बस सेवा बंद आहेत.तेव्हा दोनही आगारातून तातडीने बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक यांच्यातून तीव्रतेने होत असून याची तातडीने दोन्ही अकोले आणि संगमनेर आगाराने दखल घेऊन बस सेवा सुरू कराव्यात.
श्री सुशांत आरोटे
तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले