इतर

सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपये अपहार , चौकशी अधिकारी नियुक्त!


घोटाळ्यास जबाबदार शाखा व्यवस्थापकाला बडतर्फ करा अन्यथा उपोषण -अरुण रोडे


दत्ता ठुबे

“”””””””””””””””””

कर्जत सैनिक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालकांना हाताशी धरुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, केल्याचा आरोप करत त्याला बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रोडे यांनी दिला आहे.

कर्जत सैनिक बँकेचा शाखा व्यवस्थापक असलेल्या फरांडे गेली 10 वर्ष कार्यरत होता. या काळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, झाला असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल आहेत. कर्ज फाईली, बोगस चेक, आदी अन्य प्रकाराच्या तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी झाल्यास फरांडेसह त्याला पाठबळ देणारे मुख्य कार्यकारीअधिकारी व चेअरमन हे देखील चौकशीच्या फेर्‍यात सापडणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या मर्जीतील फरांडे असल्याने त्यांच्यावर अद्याप पर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे. त्याला त्वरित बँक कामकाजापासून दूर ठेवत चौकशी होईपर्यंत बडतर्फ करण्याची मागणी रोडे यांनी केली आहे.



1 कोटी 79 लाख अपहाराच्या प्रकरणात जबाबदार असणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ सुटण्यासाठी सदर अपहार लिपिकांवर ढकलत असल्याचा प्रकार समोर आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःच्या अज्ञानापोटी पारनेर, कर्जत पोलीस स्टेशनला लिपिकांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्याचा प्रयत्न केला. परंतु पारनेर, कर्जत पोलिसांनी आर्थिक घोटाळ्याची रक्कम कोट्यावधींच्या घरात असल्याने सदर तक्रार आर्थिक गुन्हे विभाग नगर शाखा येथे करावी असा सल्ला दिला. या प्रकरणात फक्त लिपिकाला गुंतवण्याचा डाव ओळखून आर्थिक विभाग नगर शाखेनेही शासकीय लेखापरीक्षकांचा अहवाल घेऊन येण्याचे सुचवत त्यांना माघारी धाडले.


पोलिसांनी सखोल माहिती घेऊनच व सहकार खात्याचा लेखापरीक्षणाचा शासकीय अहवाल आल्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी सभासद विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी केली आहे.

सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरणी अप्पर लेखा परीक्षक एस.एन. पिंगळे यांची नियुक्ती सहकार विभागाने केली असून, तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तत्कालीन शाखा आधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन व काही संचालक चौकशीच्या फेर्‍यात सापडणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button