इतर

आबासाहेब काकडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षामधील वार्षिक स्नेहसंमेलनाचा व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दिनांक ३० व ३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री .विलासजी पुजारी साहेब हे होते .तसेच विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे ,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे, श्रीमती मंदाकिनीताई पुरनाळे, शिक्षण विभागाच्या प्रमुख श्रीमती वंदना पुजारी, उपप्राचार्या रूपा खेडकर , पयवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, प्रा .शिवाजी पोटभरे, शिक्षक प्रतिनिधी प्रा. सखाराम घावटे ,बाळासाहेब जाधव शिक्षकेतर प्रतिनिधी योगेश इटेवाड आदि मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे उद्घाटक विलासजी पुजारी साहेब यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेवून प्रयत्न करावेत असा विद्यार्थ्यांना संदेश दिला .
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला .यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार ,गीत – गायन ,नाटक, एकपात्री प्रयोग, समाज प्रबोधन पर नाटिका ,लावणी नृत्य आदि जवळपास ८० कार्यक्रम सादर केले व उपस्थितांची दात मिळवली .
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड. डॉ . श्री विद्याधरजी काकडे साहेब, प्रमुख अतिथी डॉ .सुभाषराव निवृत्ती शेकडे (साहित्यीक ) श्रीमती उर्मिला शिंदे ( उद्योन्मुख कलाकार )संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा .लक्ष्मण बिटाळ , संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे ,विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर ,पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, प्रा शिवाजी पोटभरे, शिक्षक प्रतिनिधी प्रा . सखाराम घावटे ,बाळासाहेब जाधव ,शिक्षकेतर प्रतिनिधी योगेश इटेवाड ,विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी तमनर , धनंजय उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अध्यक्ष सूचना प्राचार्य संजय चेमटे यांनी मांडून प्रमुख पाहुण्यांना विद्यालयाच्या विविध उपक्रमांची व यशाच्या उत्तुंग आलेखाची माहिती दिली .
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यालयात पार पडलेल्या मेहंदी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान -गणित प्रदर्शन, फूड फेस्टिवल , पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रमयातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले .तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यालयाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुभाषराव शेकडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या विद्यालयाची प्रगती ही साता समुद्रापलीकडे गेलेली आहे . अॅड. शिवाजीराव काकडे साहेब व सौ . हर्षदाताई काकडे यांच्यामुळे संस्थेचा आज एवढा नावलौकिक वाढलेला आहे .विद्यार्थ्यांना संदेश देताना ते म्हणाले की ,मोबाईलचा वापर राजहंसासारखा करावा .तुम्ही सर्व विद्यार्थी अष्टपैलू आहात, सदैव अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे .यावेळी त्यांनी विविध कविता, ओव्यांचे गायन केले व उपस्थितांची मने जिंकली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले .आपले विद्यालय हे एक ज्ञानदान करणारे व संस्कारशील विद्यालय आहे .या विद्यालयाला देशातील सर्वात उत्कृष्ट विद्यालय आपण बनवण्याचा निर्धार करूया असे प्रतिपादन केले .विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे तसेच भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवावेत असे त्यांनी अवाहन केले .
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती उर्मिला शिंदे यांनी यावेळी विविध लावण्या व नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोविंद वाणी यांनी केले तर आभार प्रा . शिवाजी पोटभरे यांनी मानले तर कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button