
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आयोजित दर्पण पुरस्कार वितरण सोहळयाच्या कार्यक्रमात रावसाहेब मरकड यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी ईसाक शेख व जयप्रकाश बागडे यांची निवड करण्यात आली. त्यांनतर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी रावसाहेब निकाळजे, सौ. तारामती दिवटे याची तर खजिनदारपदी रेवणनाथ नजन, कार्याध्यक्षपदी उमेश घेवरीकर यांची निवड करण्यात आली असून सर्वाना निवडचे पत्र जिल्हाध्यक्ष दतात्रय पाचपुते यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
जेष्ठ पत्रकार शाम पुरोहित, जनार्दन लांडे, विनोद गांधी, यांची मार्गदर्शक म्हणुन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल साठे, रेवणनाथ नजन, दादासाहेब डोंगरे, रामनाथ रुईकर, किरण तहकिक, नरहारी शहाणे, विनोद शेळके, सुरेश पाटील, संदिप मोटकर, पाडुरंग निबाळकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.